२४-११-१९५६ बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे कौ, त्यांनी दर रविवारी बुद्धविहारात जावे - Page 601

बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की, . . . . बुद्धविहारात जावे ५६१

भारतातील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर बर्मा, चीन, जपान, लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या करूण दशेवर होईल व आम्ही नेहमीकरिता हिंदू धर्माच्या जाचातून मुक्‍त होऊ शकू. वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध का आवाज उठविला नाही याचे कारण म्हणजे त्यांचा समज होता की हिंदुंचे हे घरगुती भांडण आहे. जर बौद्ध धर्म स्वीकार केल्यानंतरही हिंदू लोक आम्हाला समता, स्वतंत्रता आणि बंधुत्वापासून दूर ठेवतील तर आम्ही वरील बौद्ध राष्ट्रांच्या सहयोगाने तो मिळविल्याशिवाय राहाणार नाही.

हिंदू धर्माच्या कपाळावर अस्पृश्यता हा एक भयंकर कलंक लागला आहे. याचमुळे हिंदू जातीच्या हृदयातील दुष्टता दिसून येते. अस्पृश्य पवित्र व शुद्ध होवूनही देवदर्शनासाठी जातात तरी त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. शिवाशिवी, भेदाभेद, जातपात यांना समूळ नष्ट करणे हे सवर्ण हिंदुंचे कर्तव्य आहे. आम्ही त्यांचा मुर्दा आपल्या खांद्यावर का वाहावा.

आज मी अस्पृश्यांना आवाहन करतो की त्यांनी अशाच धर्माचा स्वीकार करावा

'की ज्या धर्मात मनुष्यमात्रात भेदाभेद नाही. सारखेपणा आहे व मित्रत्वाच्या “ नात्याने ते एकत्र येऊ . शकतात. हाच उच्च आदर्श बौद्ध धर्मात आहे. . ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात व आपले अस्तित्व . विसरतात त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतंर सर्व लोक समान

होतात. कोणत्याही प्रकारची विषमता त्यांच्यात राहात नाही. बौद्ध धर्म हा अस्पृश्यांनाच नव्हे तर अखिल मानवांना देखील कल्याणकारक आहे. सवर्ण

हिंदुंनी या धर्माचा अवश्य स्वीकार करावा.

इतर धर्मात सृष्टी निर्माता ईश्‍वर समजला जातो व जे दोष राहिले त्याबद्दल ईश्वराला जबाबदार पकडले जाते. तशी विचारसरणी बौद्ध धर्मात नाही. बौद्ध धर्मात जगात दुःख आहे असे म्हटले आहे. त्या दुःखाचे निरोधन होऊ शकते व त्याकरिता कोणते मार्ग आहेत ह्याचा विचार केला आहे. हिंदू धर्मात रूढीवर सारी विचारसरणी आधारित आहे. ही रूढी -चातुर्वर्णय पद्धतीतून जन्माला आली. बौद्ध धर्मात अनेक भिक्षु व भिक्षुणी झाल्या, त्यांच्याबद्दलची ' माहिती थेर गाथा व थेरी गाथा यांच्यात सापडते.

हिंदुंना न्याय करण्याचा अधिकार होता पण त्यांनी आजवर अस्पृश्यांवर

अन्यायच केला आहे. हिंदुंपासून आपण पृथक होऊन भगवान बुद्धाच्या चरणावर नम्र झाले पाहिजे.