२५-११-१९५६ बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय - Page 605

बुद्ध धर्म हिंदू धर्माची . . . . खोडसाळ प्रचार होय ५६५

बुद्धाचा समकालीन धर्मावरील दुसरा आघात म्हणजे यज्ञसंस्थेवरील होय. गाई-बैलांचे बळी देऊन तुम्हाला कोणते उच्चश्रेय लाभणार आहे, असा त्यांचा याज्ञिकांना प्रश्‍न असे. यज्ञसंस्थेवरील बुद्धाच्या टिकेमुळे हिंदुंना इंद्रवरुणादि आद्य देवतांचा त्याग करावा लागला. थोडेसे विषयांतर करून मी तुम्हाला विचारतो, हिंदू धर्मात ईश्‍वराची (90१) कल्पना खरी आहे काय ? काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही. ब्रह्मा, विष्णूचीही तीच कथा. यांना काय देव म्हणायचे ? सामान्य माणसालासुद्धा आज लाज वाटेल अशी दृष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात. असा एक तरी देव दाखवा की ज्याचे निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत्‌ व ' अनुकरणीय वाटेल ? हिंदुंचे देव म्हणजे राजांची कुलदैवते, त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे णौरोहित्य मिळविण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेली त्यांच्या दैवतांच्या खुशामतीची पुराणे. इंद्र, कृष्ण काय हे देव ? ऋम्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्यीने इंद्रास | मोजलेल्या शिव्या वाचून पहा ! दुर्योधन संपूर्ण वजदेही होऊ नये व गदायुद्धात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कपट नाटक पहा. तुमचा शेजारी असे वागू लागता तर तुम्ही त्याला काय म्हणाल ! असो ! बुद्धाने पशुहत्त्येची निर्भत्सना केली आणि यज्ञाचे वैफल्य जनतेस पटवून दिले, म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले.

आश्रम व्यवस्थेसंबंधीही बुद्धाचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते. ब्राह्मणांच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते. बुद्धाच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिव्रज्या स्वीकारण्यास प्रत्यवाय नव्हता. ब्रह्मचर्याचा मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था, अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चिकटविलेला अर्थ आहे. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमाचा काळ वाढविण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला. . ब्रह्मचर्यानंतर संन्यास (परिव्रज्या) स्वीकारण्यास ब्राह्मणांची हरकत होती. अकराशे वर्षांनी कुमारिल भट्टाने बुद्धावर घेतलेल्या आक्षेपात बुद्धाच्या परिव्रज्येच्या स्वातंत्र्यावरच भर दिलेला आहे. | |

बुद्धाचा वैदिक धर्माशी चवथा विरोध चातुर्वर्ण्याबाबत होता. त्याचें शिष्य उच्च

कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते. आपल्या शिष्यांत

उच्चनीचतेच्या भावनेला जागा राहू नये, याबाबतीत तो अत्यंत दक्षता पाळीत ।

असे. आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान वाटू नये म्हणून