५६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्याने त्यांच्या समवेत आलेल्या 'उपाली' स प्रथम दीक्षा दिली. ज्याची दीक्षा अगोदरची तो नंतर दीक्षा घेणारास वंद्य समजला जाई. म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे. आपल्या जीक्नाच्या शेवटल्या दिवसात चुन्द या हीनजातीय समजल्या जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न ते प्रकृतीस अनिष्ट आहे, असे समजूनही त्याने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी प्राणाचे मोल दिले. असे चातुर्वर्ण्य विरोधी प्रसग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील. तो आपल्या संघाला सागराची उपमा देई. ज्याप्रमाणे सागरास मिळाल्यावर नदीची एथगात्मता राहात नाही आणि सर्व जल एकरूप होते त्याप्रमाणेच संघात येणाऱ्या भिन्न वर्णीय भिख्खुंचे वर्णवैशिष्ट्य नष्ट होते. जैन मतालाही चातुर्वर्ण्य निषिद्ध होते. परंतु त्या मुद्यावर भांडण करायला ते सिद्ध नव्हते. बुद्ध मात्र आपल्या मुद्यांबाबत गुळमुळीत मौन धारण ` करीत नसे. आपल्या धर्माचे आपण वीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे हे लागणारच असे त्याचे मत होते. बुद्धाची ही चातुर्वरण्यविरोधाची तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव डाचत राहिली. म्हणूनच चातुर्वरण्याविषयी मूक असलेल्या निरिशवरवादी सांख्याचार्य कपिलमुनीस त्यांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी सदैवं वैर मानले.
बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतचा होता. बुद्धाच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी आणि प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिये आणि तर्क यांच्या साह्याने सिद्ध करता येत नाही. शिवाय धम्माचा उद्देश दुःख परिहार आहे. देव मानल्याने दुःख कमी होत नाही. माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील हे शिकवणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर (50७०५॥४॥०॥) आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील समादिङ्लीला घातक अशा खुळ्या समजुतीचे (5५०७।७४।००) पेव फुटते. माणसाचे परस्पर संबध प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य. उच्चनीचता अशासारख्या भ्रामक समजुतींनी नियंत्रित होतात. देवाचे अस्तित्वावरील बुद्धाचे आक्षेप केवळ व्यावहारिक दृष्टीचेच होते असे नाही. प्रतिच्च समुत्पाद या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत. या सिद्धांताप्रमाणे देव आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न नाही. त्याप्रमाणे विश्व देवानी निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न असा की, देवाने जग कसे निर्माण केले? देवाच्या