२५-११-१९५६ बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय - Page 607

बुद्ध धर्म हिंदू धर्माची . . . . खोडसाळ प्रचार होय ५६७

अस्तित्वाचे मंडण अथवा खंडण या प्रश्‍नाच्या उत्तराने होईल. यादृष्टीने महत्त्वाचा प्रश्‍न असा “देवाने हे जग अभावातून निर्मिले की, पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले? “ काहीच नव्हते त्यातून काहीतरी निर्मिले या गोष्टींवर माणसाच्या बुद्धीला विश्‍वास ठेवता येत नाही. जर या तथाकथित देवाने हे जग पूर्वी काहीतरी होते त्यातून निर्मिले असेल तर जे नवे काहीतरी त्याने निर्मिले ते आपल्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात होते असे मानावे लागते. मग जे पूर्वी होते त्याच्या निर्मितीचा कर्ता देव ठरू शकत नाही. देवाने काहीतरी निमिण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर देवाला आद्यनिर्माता किंवा आदिकारण म्हणता येणार नाही. एकूण कारण अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदुष्ट असल्यामुळे देवावरील श्रद्धा बुद्धाच्या समदिङ्ठीप्रधान धम्माला अमान्य आहे.

वेदांतातील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याने ब्रह्मात विलीन होणे यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरूपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वसिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्म्याच्या

अस्तित्वावरील व्यावहारिक दृष्टीचे आक्षेप त्याच्या देवकल्पनेवरील आक्षेपासारखे आहेत. शिवाय तो आत्म्याचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरुप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पंत्तीबरोबरच जाणिवेचा (Consci०५१९७७) प्रारंभ होतो. इच्छात्मक, भावनात्मक आणि विचारात्मक कार्य ही जाणिवेचीच आहेत. तेव्हा आत्मा हें वेगळे तत्त्व गृहीत धरण्याची आवश्यकताच उरत नाही.

अशारितीने वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धम्म ज्या गोष्टींमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास सम्मत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच -वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली. वस्तुतः ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी. अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत. त्याला परिमार्जित भिख्खुसारखे गुहेत राहाण्याचे कारण नव्हते. भिख्खुंना पावसाळ्याच्या तीन महिन्यात कुठेतरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या