३५१
माणसा-माणसातील संबंध प्रेम, करुणा
या तत्त्वानुसार जोडणाऱ्या बौद्ध धर्माचा
मध्यवर्ती सिद्धांत समता आहे
दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ ला सायंकाळी सारनाथ येथील मूलगन्ध कुटी विहाराच्या मैदानात महाबोधी सभेद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
सुरवातीला मंगलाचरण झाल्यानंतर लद्दाखचे लामा लोबजङ् यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'खदा' (वस्त्रे विशेष) भेट केली. त्यानंतर वाराणसीच्या १८ संस्थांनी त्यांना हार प्रदान केले. सेवासंगम ट्रस्टच्या वतीने डॉ. एन. एन. शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन सुंदर सुवर्ण स्मृतिचिन्ह भेट केले. डॉ. बाबासाहेबांचे भाषण ऐकण्याकरिता सारनाथच्या जवळपास असलेल्या जिल्ह्यातील जनसमुदाय प्रचंड प्रमाणात उपस्थित होताः.”
सदरहू कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ” ही सभा महाबोधीच्या बुद्ध मंदिराच्या आवारात, धम्मेक स्तुपाच्या सावलीत होती. बुद्धाने ज्या ठिकाणी पंचवग्गीय भिख्खुंना. आपला पहिला उपदेश करून धम्मचक्रप्रवर्तन केले त्या जागी अशोकाने एक स्तूप उभारला. त्या स्तुपास धम्मेक स्तूप असे नाव आहे. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलित जनतेला उद्देशून शेवटचे भाषण व्हावे हा हृदयंगम व क्रांतिकारक योगायोग होय
बाबासाहेबांसंबंधी चार शब्द सांगताना भिख्खु घर्मरक्षित म्हणाले, “बौद्ध देशात अशी एक श्रद्धामय समजूत प्रचलित आहे की, बुद्धाच्या महापरिनिर्वाणापासून अडीच हजार वर्षांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरूत्थान घडणार आहे. ते कार्य जो बोधिसत्त्व तडीस नेईल, तो आज बाबासाहेबांच्या रूपाने आमच्यामध्ये उपस्थित आहे. अशी माझी श्रद्धा आहे. याच सारनाथात, पंचवीस शतकामागे, पाच भिख्खुसमोर आजच्या सारख्याच एका रविवारी, [या ] [समोरच्या ] [धम्मेक ] [स्तुपाच्या ] जागी भगवंतांनी धर्मचक्राचे परिवर्तन [केले. ] त्याच धर्मचक्राला नागपूर येथे गति देऊन, पाच लाख लोकांच्या हृदयात धम्माचा [पवित्र ] [संदेश ] [ज्याने ] [नेऊन ] [पोचविला, ] त्याच महापुरूषाचे आज आम्ही [स्वागत ] [करीत ] [आहोत. ] [" ]
"धर्मदूत : सारनाथ, डिसेंबर १९५६, पृ. २४६-२४७.