माणसा-माणसातील संबंध प्रेम, . . . . सिद्धांत समता आहे ५७१
आज दीड हजार वर्षे हिंदू समाजाची सुधारणा होईल आणि त्यात समता येईल,
शहाणपणा येईल याची गाव शिवेवर बसून आम्ही वाट पाहात आलो. परंतु कोणालाही सुधारणा सुचली नाही आणि कोणीही आम्हाला आत बोलाविले नाही. उलट धर्माच्या नावाखाली आमची शतकानुशतके अधिकच विटंबना आणि गळचेपी होऊ लागली. कोणी म्हणतात, समता ही भारताला अज्ञात होती. गेल्या शतकातच समतेची कुजबूज येथे सुरू झाली आहे. तेव्हा
हळूहळू हिंदू धर्मही सुधारेल आणि समतेचा अंगीकार करील ! हिंदू धर्म सुधारला
जाईल हा एक भ्रम आहे. इतिहास ग्वाही देत आहे की सामाजिक समतेचा संदेश भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षांमागे या भारताला दिला. परंतु हा संदेश दडपून टाकण्याचा या देशात बुद्धिपुरःसर नीच असा प्रयत्न झाला आणि अगदी त्याच्या विरूद्ध विषमतेवर आधारलेला आणि काही विशिष्ट वर्गाच्याच हिताची पर्वा करणारा हिंदू धर्म प्रभावशाली करण्यात आला. जोपर्यंत हिंदू धर्म पाळला जात आहे तोपर्यंत या देशातून सामाजिक विषमतेचे उच्चाटन होणार नाही. हिंदू धर्माने बौद्धिक पातळीवर कितीही उदात्त तत्त्वांचा उद्घोष केला तरी त्यांचा आचार हां वर्ण, जातपात, स्पृश्यास्पृश्यता असल्या विषमतेचा असतो. चातुर्वर्ण्य हा त्याचा पृष्ठकणा आहे. तेव्हा हिंदू धर्म सोडल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे या जगात काही लोक लाभतील. आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही विव्हळत आहोत, परंतु त्याला सहानुभूतीची साथ कोठे तरी मिळत आहे काय? नाही. कारण अन्याय करणारे सर्व हिंदू आहेत व त्यांच्या शब्दाप्रमाणे येशील राज्यतंत्र हालत आहे. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्धधर्मीय तुम्हाला बंधु मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओ दिल्याशिवाय
राहाणार नाहीत.'' *
« ७ ९
PSS
"प्रबुद्ध भारत : ३१ ऑगस्ट १९५७.