३५३
मला बौद्ध धम्म का प्रिय आहे ?
देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे : एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे ; आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुक्त आहे.
इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा धम्म प्रज्ञा (अंधश्रद्धा आणि अलौकिक घटनांविरुद्ध आकलनशक्ती), करुणा (प्रेमे आणि समतेची शिकवण देतो. मनुष्याला या प्रथ्वीवर सुखमय जीवन व्यतीत करण्यासाठी यापेक्षा वेगळे काय हवे ? म्हणून ही तीन तत्त्वे देणारा बौद्ध धम्म मला आकृष्ट करतो. जगाला तारण्याचे सामर्थ्य न ईश्वरात आहे न आत्म्यामध्ये ; ही तीन तत्त्वेच जगाच्या दृष्टीने तारक आहेत.
एक बाब अशी आहे जी जगाच्या, विशेषत: आग्नेय आशियाई देशांच्या संदर्भात विशेषत्वाने आकृष्ट करणारी ठरू शकते. जग सध्या कार्ल मार्क्स आणि त्यांनी जन्माला घातलेला साम्यवाद यांच्या आवर्तात सापडलेले आहे. हे आव्हान अतिशय गंभीर आहे. सर्व देशांच्या धार्मिक प्रणालींचा पाया या आव्हानामुळे हादरला आहे. याचे कारण म्हणजे मार्क्सवाद आणि साम्यवाद निधामिक बाबींशी निगडित आहेत. सध्याच्या धार्मिक अधिष्ठानाला बसणारा हा धक्का समजावून घेणे कठीण नाही. आजची धार्मिक प्रणाली जरी निधार्मिक रचनेपासून अलिप्त असली तरी याच प्रणालीच्या आधारावर प्रत्येक निधार्मिक बाब टिकून आहे. दूरान्वयाने का होईना, धर्माची मान्यता असल्याशिवाय निधामिक रचना फार काळ टिकणे शक्य नाही.
आग्नेय आशियातील बौद्ध राष्ट्रांची मानसिकता साम्यवादाकडे झुकलेली पाहून मला अतिशय आश्चर्य वाटते. मी तर असेच मानतो को त्यांना बौद्ध धम्माचे आकलन झालेले नाही. मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना परिपूर्ण उत्तर बौद्ध धम्मात आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. रशियन पद्धतीच्या साम्यवादाने रक्तरंजित क्रांती हे समर्थनीय साधन मान्यच केले आहे. साम्यवादी प्रणालीसाठी आसुसलेल्या लोकांना कदाचित हे माहीत नसावे की बौद्ध धम्मातील “संघ, हे एक साम्यवादी संघटनच आहे. त्यामध्ये खाजगी मालमत्तेला जागा नाही ; आणि विशेष म्हणजे हे परिवर्तन हिंसेतून आलेले नाही. मानसिक