५७८ डॉ. बाबासाहे ब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जातिव्यवस्थेची आणखीही काही खास वैशिष्ट्ये आहेत, ज्याचे अनिष्ट परिणाम होतात आणि जे लोकशाहीला प्रतिकूल ठरतात. जातिव्यवस्थेचे असेच एक खास वैशिष्ट्य म्हणजे “श्रेणीबद्ध विषमता' तिच्याशी जुळणे होय. जातींचा दर्जा समान नसतो. त्या एकदुसऱ्याच्या वर उभ्या असतात. त्या एक दुसऱ्यांचा द्वेष करतात. तिच्यात चढत्या क्रमाने द्वेष आणि उतरत्या क्रमाने तिरस्कार, तुच्छता असते. जातिव्यवस्थेच्या या विशेषाचा होणारा सर्वाधिक घातक परिणाम म्हणजे परस्पर सहकार्य करण्याच्या भावनेला आणि इच्छेलाच ती उद्ध्वस्त करते.
वास्तवतेत जात आणि वर्ग यामध्ये भिन्नता अशी की, जातिव्यवस्थेत असल्याप्रमाणे वर्गव्यवस्थेत संपूर्ण बहिष्कृतता नसते. विषमता हा जातिव्यवस्थेचा दुसरा दुष्ट परिणाम आहे. प्रत्यक्षात दोन जातीतील उत्तेजना आणि प्रतिसाद हे मुळातच एकांगी आहेत असे दर्शविते. उच्च जातींनी एका ठरावीक पद्धतीने वागावे आणि खालच्या जातींनी एका रूढ झालेल्या पद्धतीनेच प्रतिसाद द्यावा. याचा अर्थ असा की, विविध जातींना प्रोत्साहनाची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची समान संधी उपलब्ध नसल्याने परिणामत: यामुळे काहींना मालक होण्याचे शिक्षण मिळते तर इतरांना गुलाम होण्याचे शिक्षण मिळते. जीवनातील विविध अनुभवांच्या मुक्त आदान प्रदानाला प्रतिबंध केल्यामुळे प्रत्येक घटक त्याच्या नैसर्गिक अधिकाराला मुकतो. यामुळे विशेषाधिकार असणारे आणि नैसर्गिक अधिकार हिरावून घेतलेले असे दोन वर्ग समाजात निर्माण होतात. असे विभाजन, सामाजिक अभिसरणाला (०९11 1059110518) प्रतिबंध करते.
जातिव्यवस्थेच्या तिसऱ्या वैशिष्ट्याचा दुष्टपणा असा की, ती लोकशाहीची मुळेच निखंदून टाकते. प्रत्येक जात एका विशिष्ट व्यवसायाला बांधलेली असते. प्रत्येक व्यक्ती इतरांना उपयुक्त होईल अशा पद्धतीने स्वतःच्या नैसर्गिक आवडीनिवडीप्रमाणे व्यवसायाची निवड करीत असेल तर त्यामुळे निश्चितपणे समाज सुसंघटितरीत्या स्थिर राहील. अशा प्रकारच्या आवडीनिवडींचा शोध घेणे आणि समाजोन्नतीसाठी त्या दिशेने त्यांना घडविणे हे समाजाचे कर्तव्य आहे. परंतु प्रत्येक माणसात क्षमतेची आणि कृतिशीलतेची अमर्याद विविधता असते जी व्यक्तीला घडवू शकते. लोकतांत्रिक स्वरूप असलेल्या समाजाने व्यक्तीतील सर्व क्षमतांना मार्ग मोकळा करून द्यायला हवा. स्तरीकरण हे व्यक्तिविकासाला खुंटविते आणि जाणीवपूर्वक केलेली खुंटविण्याची प्रक्रिया लोकशाहीला हेतुपुरस्सर नकार देते.