१७-२-१९४६ मरणाच्या तयारीनोच आम्ही समरांगणात उतरलो आहोत - Page 63

मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत २५

काँग्रेसला व हिंदुंना माझे सांगणे आहे की, दंगाधोपा करून आम्हाला

निवडणुका जिंकायच्या नाहीत. सामना करायचाच म्हटले तर आम्ही काही

बांगड्या भरलेल्या नाहीत ! (टाळ्या) आम्हाला सामर्थ्य नसले तरी स्वाभिमान

आहे. ज्यांनी आमच्यावर हात टाकला त्यांना आम्ही शरण आणूच (प्रचंड

टाळ्या).

हिंदुंना माझे एकच सांगणे आहे की, तुमचे राजकारण जसे इंग्रजांच्या

सत्तेखालून स्वतंत्र होण्याचे आहे तसे आमचेही राजकारण हिंदुच्या गुलामगिरीतून

स्वतंत्र होण्याचे आहे. तुम्हाला जसे इंग्रजांचे राज्य नको तसे आम्हाला हिंदुंचे

राज्य नको आहे. इंग्रज गेले तर हिंदुंना स्वराज्य मिळेल. इंग्रज जाऊन

त्यांच्या जागी हिंदू लोक येतील. आज मध्यवर्ती मंत्रिमंडळात काही युरोपियन

आहेत. त्यांच्या जागी ब्राह्मण, कायस्थ, बनिया जाऊन बसतील. परंलु या

लोकांवर आमचा तीळमात्र विश्वास नाही. गेली दोन हजार वर्षे हिंदुंनी आमची

गळचेपी करून दुर्दशा केली. हजारो वर्ष हिंदुरूपी अजस्त्र अजगर आमच्या

शरीराभोवती विळखा घालून बसला आहे. ज्यावेळी हा विळखा सुटेल तोच

आमच्या स्वातंत्र्याचा दिवस ! आमच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुंच्या सत्तेला आमचा

कसून विरोध आहे. हजारो वर्षे ज्यांनी आम्हाला दडपले ते सत्ताधारी

झाल्यावर त्यांना पाझर फुटेल असे कोण म्हणू शकेल ! जे लोक आमच्या

स्पर्शने सचैल स्नान करतात ते आमचा उद्धार करतील असे एखादा वेडाही कबूल करणार नाही. हिंदुंनाच जर ही सत्ता मिळाली तर तो आमचा घात आहे. म्हणून या देशाच्या राजसत्तेत आम्हास आमचा वाटा मिळालाच पाहिजे, सत्ता संपादनासाठीच आमचा लढा आहे. हिंदुंनी कितीही कारस्थाने केली तरी या देशाचे सत्ताधारी होण्याची आमची प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करूच करू !

(प्रचंड टाळ्या)

सध्याचा संभाव्य दुष्काळ कसा टाळावा असा सर्वाच्या पुढे एक प्रश्‍न उभा आहे. हिंदुंना जर विचारले की, हा दुष्काळ कसा टळेल ? तर ते सांगतात की, राष्ट्रीय सरकार आल्याशिवाय दुष्काळ टळणार नाही. राष्ट्रीय सरकार यावयाचे म्हणजे सध्याच्या युरोपियन मंत्र्यांऐवजी हिंदू मंत्री यावयाचे. अशा प्रकारे बनलेल्या या राष्ट्रीय सरकारच्या टाळूवर काय शाळू उगवणार आहे ? म्हणे राष्ट्रीय सरकार आले की, दुष्काळ नाहीसा होईल. परंतु हा सर्व फसवाफसवीचा खेळ आहे, लपंडाव आहे. सत्ता संपादनासाठी हिंदुंच्या कारवाया चालू आहेत. आजचा प्रसंग अस्पृश्यांच्या भवितव्यतेच्या दृष्टीने फार मोलाचा आहे. हिंदू लोक आमचे हक्क हिरावू पाहतात. पण आमचा मरण्याचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही (टाळ्या). आमचे हक्क जर मिळाले नाही तर आमच्या हक्कासाठी मरण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. गांधींनी कितीही नाक मुरडले, वल्लभभाई कितीही डरकाळले व जवाहरलाल नेहरू कितीही

जळफळले तरी त्याची कोणीही पर्वा करणार [नाही. ]