मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत २७
११ मार्चला मते देण्यास गेलेच पाहिजे. ३ जानेवारीला मुंबईतील प्राथमिक
निवडणुकीत आपल्या दोन्ही उमेदवारांस ११-१२ हजार मते मिळाली व
काँग्रेसच्या उमेदवारास २/२ हजार मिळाली. त्यांनी ही मते पुरभय्यांना महार
मांगाची नावे पाठ करून द्यावयास लावली. यापासून आपण चांगलाच धडा
घेतला पाहिजे. येत्या निवडणुकीत खोटेच लोक तुमची मते देऊन जातील. ही
गोष्ट होता कामा नये. तेव्हा तुम्ही सकाळीच मते देण्याच्या ठिकाणी हजर
राहिले पाहिजे. नाहीतर दुसरेच लोक तुमची मते देऊन जातील. आपणास
गाडी घोडा काही मिळणार नाही. कॉँग्रेसचे लोक त्या दिवशी गाड्यांचा मक्ता
घेतील. तुम्ही पायी जाऊन मत दिले पाहिजे. निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसचे
लोक भीती दाखवतील, धाकदपट्या करतील. या बाबतीत समता सैनिक दलातील लोकांनी काळजी घेतली पाहिजे. हिंदुलोक तर आपल्याविरुद्ध आहेतच पण सरकारचे पोलिससुद्धा आपल्याविरुद्ध आहेत, तेव्हा आपल्या लोकांना संरक्षण देण्याची कामगिरी समता सैनिक दलावर आहे. यापूर्वी दलाने चांगली कामगिरी बजावली आहे. आपल्या लोकांना कांग्रेस व पोलिस यापासून त्रास होणार नाही याची खबरदारी दलाने घेतली पाहिजे.
यापूर्वी समता सैनिक दलाने अनेक प्रसंगी प्रशंसनीय कामगिरी बजावलेली आहे. या दलावर मोठीच कामगिरी आहे. कार्याच्या सुलभतेसाठी या निवडणुकीपुरती फेडरेशनचे अध्यक्ष श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दलाने आपली कामगिरी बजावली पाहिजे.
माझा असा दृढ विशवास आहे की, आपले गडी नुसतेच विजयी होणार नाहीत तर ते प्रतिपक्षाला चारी मुंड्या चीत करून विजयी होतील. लोकशाही लोकशाही म्हणून आज काँग्रेसचे लोक टाहो फोडीत आहेत, त्यांना लोकशाही म्हणजे काय, हे तरी माहीत आहे काय ? असेल तर त्यांना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती. ज्यांना ९० टक्के मते पडली ते निवडून आले असे ते समजले असते कोणी संग्राम केला नसता. ११ तारखेला तुम्ही विरोधकाला धूळ चाराल अशी मला फार आशा आहे. तुम्ही मला १७,००० रुपयांचा चेक दिला त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. हे पैसे निवडणुकीच्या चटणीलाही पुरणारे नाहीत. आपण वर्तमानपत्रात वाचतो की, गांधींना ५ लाखांची थैली अर्पण करण्यात आली. नेहरूंना ३ लाखांची थैली अर्पण करण्यात आली. पैसे थोडे मिळाले म्हणून बिलकूल खेद वाटत नाही. आपले राजकारण हे विक्रीचे राजकारण नाही. ते दिलाचे राजकारण आहे, ते अंत:करणाचे राजकारण आहे. गेल्या वीस [वर्षात ] [मला ] [५,००० ] [रुपये ]