२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सुद्धा मिळालेले नाहीत. त्या बाबतीत मला काही वाईट वाटत नाही. आमचे लोक हिंदुंच्या खांद्याला खांदा लावून बसतात. माझ्या लीकात उन्नतीचा आत्मविश्वास जागृत झालेला आहे, याच्यातच मला आनंद वाटतो,
बंधुभगिनींनो, मी आता विशेष काही सांगू इच्छित नाही. तुमच्या ध्येयनिष्ठेबद्दल, कर्तव्यदक्षतेबद्दल मला दृढ विशवास आहे. मी तुमच्याकडून जास्त काही मागू इच्छित नाही. मी दिल्लीला गेल्यावर एकच अपेक्षा करीत राहीन ती म्हणजे ११ तारखेच्या विजयाच्या तारेची !