२६-३-१९४६ तांडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यधता - Page 68

३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अध्यक्ष महाराज,

फायनान्स बिलावर चालू असलेल्या चर्चेत भाग घेण्याची मला संधी दिलीत यांबद्दल मी आपले आभार मानतो. कारण मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या माझ्या खात्याबह्दल नाहीत. आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यात माझ्या खात्याबद्दल विशेष अशी कोणतीच टीका केली गेलेली नाही याबद्दल मला समाधान वाटते. तरीही मी बोलण्यासाठी उभा राहिलो आहे. त्याचे कारण काल फायनान्स बिलावर बोलताना माझे मित्र पंडित गोविंद मालवीय यांनी अस्पृश्यांकरिता उघडण्यात येणाऱ्या कॉलेजच्या योजनेसंबंधीही सांगितले आहे.

कॉलेजच्या योजनेचे परिक्षण शिक्षण खात्याने करून फायनान्स डिपार्टमेंटने त्याला मान्यता दिली असल्यामुळे तत्संबंधीचा खुलासा या खात्याना करू देणे बरे झाले असते. मी त्या योजनेला केवळ चालना दिली होती. असे असताही माझे मित्र गोविंद मालवीय यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देण्याचे काम उपरिनिर्दिष्ट खात्याकडे न सोपविता मी माझ्याकडे घेतले आहे. त्याचे कारण एकच की, या कॉलेजच्या योजनेवर टीका करताना तिला राजकीय स्वरुप देण्याचा माझ्या मित्रांनी प्रयत्न केला आहे. |

या योजनेसंबंधी बोलताना माझे मित्र सुरवातीसच म्हणाले की, ' या योजनेबद्दल मला आश्‍चर्य वाटते.' आणि मी ज्यावेळेस त्यांचे सबंध भाषण वाचले त्यावेळेस मला आढळून आले की माझ्या या मित्राला आश्‍चर्य वाटण्याचे कारण त्यांचा असा समज झालेला दिसतो की शैक्षणिक क्षेत्रात पक्षांधतेचे भूत घुसडण्यात आले आहे. या बाबतीत माझ्या मित्राला, एका सुविख्यात म्हणीची आठवण करून द्यावीशी वाटते. ' कांचेच्या घरात राहाणाऱ्या माणसांनी इतरांच्या घरांवर दगडफेक करू नये ' पंडीतजीना ह्या म्हणीचा मतितार्थ उमजेल की नाही ते मला माहित नाही परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे को पंडीतजी राष्ट्रवादाच्या बाता तशा झोकू शकतात. जो साध्या हिंदुच्या हातून तर पाणी पिणार नाहीच परंतु त्यांच्याशी क्षेत्रगोत्र न जुळणाऱ्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातचेही पाणी पिण्यास धजणार नाही असा पंडीतजीसारखा माणूस राष्ट्रवादाची चर्पट पंजरी या सभागृहातील सभासदांना आणि मला ऐकवतो हे पाहून मला मोठेच नवल

वाटते.

धर्माधतेने बरबटलेल्या पावित्र्याला दुसऱ्या कुणाचाही विटाळ होऊ नये म्हणून खबरदारी वाहणाऱ्याने राष्ट्रवाद-जातीय वाद वगैरे वादांच्या नावाने कोकलत उठून दुसऱ्यावर जातीवाचकतेचा, पक्षांधतेचा-पक्षपातीपणाचा आरोप करण्यापूर्वी बराचसा विचार करायला हवा. बनारस येथील बनारस हिंदू विशवविद्यालयाशी बऱ्याच प्रमाणात पंडितजींचा संबंध होता, अगर आहे ही गोष्ट पंडितजींनी