२६-३-१९४६ तांडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यधता - Page 69

तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो, कृतीने जात्यंधता ३१

विसरू नये. , पंडितजींना मी असे विचारतो की, बनारस हिंदू विश्वविद्यालय ही जातिवाचक संस्था नव्हे काय ? उलट मी तर असे म्हणतो की,बनारस हिंदू विश्वविद्यालय हे सर्व हिंदुधर्मियांसाठी नसून केवळ हिंदुधर्मातल्या एका विशिष्ट जातीच्या देखरेखीखालील खास त्यांच्यासाठीच चालविण्यात आलेली संस्था आहे. या विश्‍वविद्यालयाचे अध्यापक वर्गात ब्राह्मणेतर जवळ जवळ नाहीतच ही गोष्ट माझे मित्र नाकारू शकतील काय ?

हिंदू धर्मशास्त्राचे अध्यापकत्व कोणाही, मग त्याची त्या शास्त्रातील शैक्षणिक लायकी कितीही उच्च दर्जाची असली, तरी ब्राह्यणेतराला देण्यात येऊ नये अशा प्रकारचा अभंग ठराव १९१६ साली या विशश्‍वविद्यालयाने केलेला नाही काय ? लांब कशाला 'अगदी अलिकडे एका कायस्थ मुलीला ब्रह्मज्ञानाच्या अभ्यासासाठी या 'विश्‍्वविद्यालयाने परवानगी नाकारल्यामुळे उपोषण करावे लागले ही गोष्ट तरी माझे मित्र विसरले नसतील. ही सर्व उदाहरणे काय दर्शवितात. जात्यंधता-धर्माधता-पक्षंपातीपणा नव्हे का हा? याला पंडितजीजवळ काय उत्तर आहे ?

अस्पृश्यांकरिता स्वतंत्र कॉलेज स्थापनेच्याबाबतीतील कालच्या चर्चेचा अहवाल वाचीत असता माझे दुसरे मित्र श्री. अयंगार ह्यांचे काही उद्गार मला आढळले. श्री. अयंगार यांच्या खुद शहरी काय घटना घडत आहेत त्या त्यांनी मुद्दाम दृष्टीआड केलेल्या आहेत असे दिसते. त्यांना मी असे सुचवू इच्छितो

की, मद्रास येथील या महिन्याच्या बारा तारखेचे ' हिंदू ' वर्तमानपत्र वाचावे. त्यात त्यांना आढळेल की, सालेम येथे त्यांच्या जातभाईनी एक मोठी सभा भरवून खास ब्राह्मणांची अशी एक मोठी संस्था स्थापावी आणि या संस्थेमाफत ब्राह्मणांचे हितसंरक्षण, ब्राह्मणांचे कॉलेज व ब्राह्मणांसाठी उद्योगधंदे वगैरे गोष्टी करण्याचे ठरविले आहे आणि या ब्राह्मणांच्या परिषदेचा अध्यक्ष कोण तर सर सी. पी. रामस्वामी आयरसारखी विभूती.

या देशातील प्रत्येक मनुष्य तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो करीत असतो परंतु कृतीने जात्यंधता, पक्षांघता यांच्याच आहारी गेलेला आढळतो.

ज्या समाजाला आपल्या तीव्रतर हालअपेष्टांची पहिल्यावहिल्यानेच जाणीव झालेली आहे तो अस्पृश्य समाज या हालअपेष्टातून आपली सुटका करून घेण्यासाठी उच्च शिक्षण संपादनार्थ शैक्षणिक संस्था स्थापू लागल्याबरोबर

' जनतेच्या कल्याणाचे कंकण बांधून आम्ही येथे आलो आहोत ' असे सांगत हिंडणारे सभासद ' पक्षांधता-जात्यंधता ' असे किंचाळित उठतात.