२६-३-१९४६ तांडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यधता - Page 71

तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो, कृतीने जात्यंधता ३३

माझ्या मित्रांनी या चर्चेमध्ये दुसऱ्या एक बाबीला हात घातला होता. त्यांनी हो बाब का उपस्थित केली हे कळणे कठीण आहे. ती बाब म्हणजे राजकारण. नुकत्याच झालेल्या निवडणुकीसंबंधी बोलताना माझा पुराच बोऱ्या वाजला असे त्यांनी म्हटले. असे सांगण्यात त्यांना काय साधायचे होते हे तेच जाणोत परंतु मला असे वाटते की माझ्या म्हणण्याला हिंदुस्थान सरकारने मान्यता द्यायला नको होती असे त्यांना सुचवायचे होते. ते काही असो. माझी स्थिती सुकून गेलेल्या रोपट्याप्रमाणे झाली आहे, असे म्हटले जाते. त्या विरोधकांना मला हे सांगावयाचे आहे की वसंतऋतू पूर्वीची ही स्थिती आहे. माझी चळवळ अमर आहे.

निवडणुकीच्या निकालाबाबत माझ्या मित्रांनी बोलणे काढले आणि त्यात त्यांनी हे सांगितले की अस्पृश्यांच्या सर्व राखीव जागा काँग्रेसने जिंकल्या. परंतु मला त्यांना हे विचारायचे आहे की काँग्रेसने ज्या मार्गांनी या जागा जिंकल्या आहेत ते मार्ग त्यांनी कधीतरी पडताळून पाहिले आहेत काय ? कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करण्यात आला ते मी सांगतो आणि तेही भक्कम पुराव्यावर आधारभूत असलेल्या गोष्टीनिशी सांगतो.

बऱ्याच ठिकाणी मतदारांना मतदानकेंद्रावर जाऊ देण्यात आले नाही. सातारा जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडले आहे. पत्री सरकार ज्या ठिकाणी अस्तित्वात होते त्या या सातारा जिल्ह्याची बहुतेक सभासदांना माहिती असेलच. ३६१ गावातील अस्पृश्य मतदारांना गावकऱ्यांनी गाव कचेरीत नेले. ' काँग्रेसला तुम्ही मते देणार की नाही? असे दमदाटी देवून त्यांना विचारण्यात आले. ज्यावेळेस अस्पृश्य मतदारांनी काँग्रेसला मत देण्याचे साफ नाकारले त्यावेळेस त्यांना कचेरीत सक्तीने डांबून ठेवण्यात आले, आणि त्यांनी (अस्पृश्य मतदारांनी) इकडच्या इकडे हालू नये म्हणून त्यांच्यावर सक्त पहारा ठेवण्यात आला. या प्रकारची कितीतरी उदाहरणे मी देवू शकेन. हे तर काहीच नाही परंतु काँग्रेसला विरोध करण्यासाठी उभे राहिलेल्या अस्पृश्य [उमेदवारांना ] मारहाणही करण्यात आली. लांब कशाला अगदी काल-परवा निवडणूक झालेल्या आग्रा शहरातलेच उदाहरण [घ्या. ] निवडणुकीच्या दिवशी अस्पृश्यांची पन्नास घरे जाळण्यात आली. अस्पृश्य मतदार मते देण्यासाठी मतदान [केद्रावर ] गेलेले पाहून, २० जणांची घरेदारे [लुटण्यात ] [आली. ] नागपूरमध्ये सात जणांचे खून करण्यात आले आणि हे [सर्व ] [काँग्रेसवाल्या ] [सवर्ण ] [हिंदुंनी ] [केले.. ] [निवडणूका ] जिंकण्यासाठी उपयोजिलेले मार्ग [हे ] [असे ] [आहेत. ] काँग्रेसने या जागा जिकल्या किंवा ज्या राजकीय पक्षाचा मी [प्रतिनिधी ] [आहे ] [त्या ] [शेड्यूल्ड ] [कास्ट्स्‌ ] [फेडरेशनने ]