२६-३-१९४६ तांडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यधता - Page 72

३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जिंकल्या हे ठरवावयाचे असेल तर त्याला सर्वसाधारण निवडणुकीच्या निकालावरून ही गोष्ट ठरविणे निव्वळ मूर्खपणाचे ठरेल कारण सर्वसाधारण निवडणुकीत अस्पृश्यांचे प्रमाण शेकडा ५ टक्के आणि हिंदूंचे ९५ टक्के पडते. अशा परिस्थितीत कोण कुणाचा प्रतिनिधी हे कसे ठरविता येईल ? म्हणूनच निवडणुकीच्या निकालाची खरी कसोटी प्राथमिक निवडणुकीच्या निकालावरूनच घेतली पाहिजे. कारण अस्पृश्यांच्या प्राथमिक निवडणुकी स्वतंत्र मतदार सघाच्या तत्त्वावर झालेल्या आहेत. या प्राथमिक निवडणुकींचे निकाल कसे लागले ? माझ्या समोर बसलेल्यांना त्याची थोडीशी कल्पना यावी म्हणून काही ठिकाणचे निकाल मी येथे देतो.

पंजाबमध्ये तीन ठिकाणी प्राथमिक निवडणूकी झाल्या. मुंबईत देखील तीन ठिकाणी, मध्य प्रांतात चार ठिकाणी, मद्रासमध्ये दहा ठिकाणी आणि-संयुक्त प्रांतात दोन ठिकाणी. येथे सभासदांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, प्राथमिक निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी सक्ती नसते. जोपर्यंत अस्पृश्यांचे पाच उमेदवार उभे राहात नाहीत तोपर्यंत प्राथमिक निवडणूक होऊ शकत नाही. निवडणुकीत मोकाट उधळण्यास मिळणारा काळ्या बाजारातला पैसा अस्पृश्यांजवळ नसल्यामुळे अस्पृश्यांना प्राथमिक निवडणूक नकोच असते.

एकंदरीत २२ ठिकाणी प्राथमिक निवडणुका झाल्या. प्रत्येकीत कॉँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. या बावीसपैकी एकोणवीस ठिकाणी शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या उमेदवारांना सर्वात अधिक मते मिळाली, मुंबईमध्ये दोन ठिकाणी झालेल्या निवडणूकीत भायखळा विभागात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या उमेदवाराला ११,३३४ मते पडली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी २,०९६ पडली, मुंबई जी. व उपनगर विभागात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या उमेदवाराला १२,८९९ आणि काँग्रेसच्या उमेदवाराला २,०८८ पडली. मध्य प्रांतातले मी फक्त दोनच ठिकाणचे आकडे देतो. नागपूर मतदार संघात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या उमेदवाराला १,९३३ आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी २७० पडली. भंडारा विभागाल शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनला ३,१८७ आणि काँग्रेस व इतर स्वतंत्र उमेदवार या सर्वांना मिळून ९७६; आग्रा विभागात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनला २,२४८ आणि काँग्रेस व इतर सर्व स्वतंत्र उमेदवारांना मिळून ८४०, पंजाबमध्ये लुधियाना-फिरोझपूर विभागात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनला १,९०० मते पडलीत कॉंग्रेसला अवघी ५०० मते मिळाली. (डॉ. बाबासाहेब बोलत असताना, यावेळेस दिवाण चमनलाल या काँग्रेस पक्षीय आमदाराने मध्येच उठून म्हटले की, '“ डॉ. आंबेडकर निव्वळ