२६-३-१९४६ तांडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यधता - Page 73

तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो, कृतीने जात्यंधता ३५

थापा मारताहेत ! “ डॉ. बाबासाहेब रागाने लाल झाले आणि या शब्दांना त्यांनी हरकत घेतली. त्यावेळेस अध्यक्षांनी दिवाण चमनलाल यांना उद्देशून म्हटले की ' ज्यावेळेस नामदार आपले म्हणणे मुद्यानिशी मांडताहेत त्यावेळेस मध्येच उठून असा गोंधळ करणे इष्ट नाही, उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांना उत्तर देताना नामदारांचे म्हणणे शांतपणे ऐकलेच पाहिजे. नामदार बोलताना ते थापा मारताहेत असे कोणत्याही आमदारांना बोलता येत नाही. “ अध्यक्षांच्याकडून या कानपिचक्या मिळाल्याबरोबर दिवाण चमनलाल यांनी आपले उद्गार मागे घेतले. नंतर डॉ. बाबासाहेबांनी पुन्हा बोलावयास सुरवात केली.) मद्रास प्रांतातील फक्त एकाच ठिकाणचे मी आकडे देतो. अमलापुरम्‌ या विभागात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या उमेदवाराला १०,५४० आणि काँग्रेसच्या उमेदवाराला २,३८३ मते पडली. प्राथमिक निवडणुकींच्या निकालाचे. आकडे हे असे आहेत. याच्यावरून एक गोष्ट सहज सिद्ध होते की, प्राथमिक निवडणुकीचे निकाल हीच खऱ्या प्रतिनिधित्वाची कसोटी मानण्यात आली पाहिजे.

या निवडणुकीत काँग्रेसने सप्रमाण सिद्ध करुन दाखविले की ही निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूक होती, त्याबरोबरच ज्यासाठी मी आजतागायत लढा देत आलो आहे की ' अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळालाच पाहिजे त्या माझ्या लढ्याला या निवडणुकीने भक्कम बळकटी आणली आहे

पंडित मालवीय यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की, अस्पृश्योध्दाराकडे हिंदू लोक बरेच लक्ष पुरवीत असून अस्पृश्यांच्या नैतिक व महत्वपूर्ण प्रगतीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत असतात. .यावर मी इतकेच-सांगतो की, बाहेरचे बाजूलाच राहू द्या पण या सभागृहाच्या चार भितीत ज्या. काही [गोष्टी ] घडतात त्याच्यावरूनच ठरवायचे झाले तरी- कोणीही [निःपक्षपाती ] [माणूस ] [हेच ] [म्हणेल ] [की ] मालवियांच्या उपरिनिर्दीष्ट उद्‌गारात काहीच तथ्य नाही. या.सभागृहात दाखल होऊन मला थोडे दिवस झाले आहेत खरे, [परंतु ] [या ] [सभागृहातील ] [कामकाजाचे ] अहवाल अगदी नियमितपणे पण [लक्षपूर्वक ] [मी ] [वाचीत ] [असतो ] [आणि ] [जे ] जे वाचनीय आहे त्यापैकी मी काहीच [शिल्लक ] [ठेवले ] [नाही. ] त्यात मला असे आढळून आले की, अस्पृश्यांच्यावर [गावोगावी ] [दैनंदिनी ] [होणारे ] [अन्याय, ] [अत्याचार ] आणि जुलूम यासंबंधी या सभागृहात [एकाही ] [सभासदाने ] [एकही ] [प्रश्‍न ] [कधीही ] विचारला नाही. अस्पृश्यांसाठी काही तरी केले [जावे ] [असा ] [एकही ] [ठराव ] [एकाही ] सभासदाने मांडल्याचे आजतागायतच्या [अहवालात ] [कुठेच ] [दिसत ] [नाही ] [; ] [नाही ] म्हणायला १९३३ साली [समोर ] [बसलेल्या ] [काही ] [सभासदांनी ] [अस्पृश्यता ] [घालविण्याचे ] धाडस केले होते [खरे. ] मंदिर-प्रवेशाचे एक बिल [मांडण्यात ] [आले ] [होते. ]