२६-३-१९४६ तांडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यधता - Page 74

३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ज्यावेळेस या बिलाला व्हॉईसरॉयनी मान्यता देण्याचे नाकारले त्यावेळेस केवढा गहजब करण्यात आला होता. या बिलाला परवानगी देण्यात आली नाही तर आम्ही आत्महत्त्या करू अशी धमकीही बऱ्याच जणांनी दिली होती. परंतु ज्या वेळेस बिलाला परवानगी देण्यात आली त्या वेळेस ठाऊक आहे तुम्हाला काय झाले ?

ते बिल परत घेण्यात आले. बिचाऱ्या रंगा आय्यरची परिस्थिती अगदी केविलवाणी झाली होती कारण त्यांनीच ते बिल मांडले होते ; ज्यावेळेस त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला दगा दिला त्यावेळेस तो गृहस्थ खूप चिडला. त्यांना पुष्कळ शिव्या दिल्या पण अखेर बिचारा तोंडघशी पडला. आणखी दोन प्रसंगी अस्पृश्यांच्याबद्दल प्रश्‍न निघाल्याचे मला ठाऊक आहे. त्यापैकी एक, १९१६ मध्ये 'अस्पृश्यांच्या तक्रारीसंबंधी एक चौकशी समिती ' नेमण्याबद्दल माणेकजी दादाभाई यांनी ठराव मांडला. त्यावेळी या चर्चेला तोंड फोडणाऱ्या श्री. गोविंद मालवीय यांच्या खुद्द वडिलांनीच या ठरावाला अगदी जोरदार विरोध केला. दुसरा प्रसंग १९२७ सालचा. अस्पृश्य जमात अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना घटनात्मक संरक्षण देण्यात यावे असे खिस्तवासी लॉर्ड बकनहेड त्यावेळेस म्हणाले होते. परंतु >. क « << & 4५

ज्या ज्या वेळेस आम्ही स्वतः लढा पुकारुन आमचे अस्तित्व दाखवितो त्याचवेळेस फक्त पलिकडे बसलेल्यांना आमचा अगदी अमर्याद पुळका येतो. ज्या ज्या वेळी आम्ही मागणी करतो की आम्हाला : ' स्वतंत्र मतदार संघ हवा, नोकऱ्यांमध्ये ठराविक प्रमाणात राखीव जागा हव्या, शिक्षणासाठी ग्रँट हवी [' ] त्याचवेळेस हिंदुंना जाणीव होते की आम्ही, अस्पृश्य लोक, जिवंत आहोत, नाही तर आम्ही मेलेलोच आहोत असेच हे लोक धरुन चालतात, एरव्ही मात्र हे लोक स्वप्नात देखील आमची वास्तपूस्त करीत नाहीत. आमच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांना वाटाण्याच्या अक्षता लावताना हे लोक सांगतात, ' तुम्ही हिंदूच आहात ' बंधुभाव दाखविताना जर पदरचं काही जात असेल त्यावेळेस आम्ही ' काकाच्या मामाच्या भाच्याचे पुतणे ' आणि काहीच खर्ची होत नसेल, पर्यायाने आमचा उपयोग होत असेल, तर मात्र आम्ही बंधु. अहारे बंधुत्व.

` शेवटी इतकेच सांगतो आणि तेही ठासून सांगतो की, हिंदुंच्या दानधर्मावर जगण्याची आता आमची मुळीच इच्छा नाही. त्यांचा दानधर्म आम्हाला नको आहे. आम्ही या देशातले रहिवाशी आहोत. सरकारी खजिन्यावर जसा दुसऱ्या जमातीचा अधिकार आहे तसा आमचाही आहे. आम्हाला गुलामीत राहाण्यास लावणारी, आमची नीती प्रष्ट करणारी भीक आम्हाला मुळीच नको आहे.