२३९
आम्ही आज कदाचित लढाई हरलो असू ,
पण युद्ध मात्र आम्ही जिंकणारच जिकणार
तारीख २५ जून १९४६ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता फ्रन्टियर मेलने धडाड धडाड करीत सेंट्रल स्टेशनात प्रवेश केला, त्याचवेळी हजारो लोकांनी काढलेल्या शिटांचा एकच गलका उठला. अफाट समुद्रात तुफानाने लाटांची बेफाम खळबळ व्हावी, अगदी तशाच तऱ्हेची सेंट्रल स्टेशनात स्वागतासाठी जमलेल्या ८०,००० स्त्री-पुरूष भव्य जनसमुद्रात जोराची खळबळ उडाली. बेभान झाल्यामुळे त्यांनी आपआपसात खेटाखेटी सुरू केली. सकाळी ७ वाजल्यापासून अन्न-पाण्याशिवाय अगदी निष्ठेने तिष्ठत बसलेल्या त्या अफाट जनसमुदायाला झालेल्या त्रासामुळे आलेला शीण नाहिसा होऊन त्यांचे चेहरे फुललेल्या कमळाप्रमाणे प्रसन्न झाले. त्यांची हृदये उचंबळून आली आणि त्यांच्या डोळ्यातून आंनदाश्रू पाझरू लागले. त्यांच्यात जोराचा गलबला सुरू झाला आणि त्यांनी गंभीर, प्रदीर्घ गर्जना करण्यास सुरूवात केली.
समता सैनिक दलातील ५,००० बाणेदार वीर, बरेचसे रेल्वे पोलीस व त्यांचे अधिकारी या अफाट समुदायाची व्यवस्था लावता लावता अगदी थकून, दमून
गेले.
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. बापूसाहेब पी. एन्. राजभोज, मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे अध्यक्ष दादासाहेब बी. के. गायकवाड व मुंबईतील जनतेचे आवडते पुढारी अ. आर. डी. भंडारे आणि डॉ. बाबासाहेबांचे चिरंजीव भाऊसाहेब यशवंतराव आंबेडकर यांनी सामोरे जाऊन डॉ. बाबासाहेबांना त्यांच्या खास डब्यातून खाली उतरून घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दलाच्या दुतर्फा रांगेतून सलामी घेत जात असता कित्येक लोक त्यांच्या पायावर दर्शनासाठी उड्या घेत होते. मे. अ. भंडारे हे अगदी पुढे असल्यामुळे व दलाचे सर्वाधिकारी एम्. एम्. ससाळेकर यांनी खबरदारीने माणसांना बाजूला सारून रस्ता मोकळा केला जात होता.
काही अंतर चालून आल्यावर बाबासाहेबांच्या स्वागताप्रित्यर्थ कोवळ्या अर्भकांना काखेशी घेऊन वाऱ्याकावऱ्याची, पावसापाण्याची इतकेच काय परंतु
जनता : १३ जुलै १९४६.