आम्ही आज कदाचित . . . . . जिकणारच जिकणार ३९ स्वतःच्या व त्यांच्या तहान भुकेची पर्वा न करता अगदी तत्परतेने तिष्ठत बसलेल्या सुमारे १५,००० महिलांनी बाबासाहेबांवर आपल्या ओंजळीतील सुमनांनी अविरत अभिषेक केला. त्या प्रसंगाने सर्वाची हृदये भरून आली आणि जगातल्या कोठल्याही परमेश्वराचे ठायी नसलेली अलोट भक्ती आणि अढळ प्रेम डॉ. बाबासाहेबांवर असल्याचे अस्पृश्यांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले.
डॉ. बाबासाहेबांना तसेच पुढे नेवून अगदी ऐनवेळी तयार केलेल्या उंच व्यासपिठावरील भव्य आसनावर बसविले.
हजारो पुष्पहार त्यांच्या गळ्यात पडत होते आणि जनसमुदायात अपूर्व उत्साहाच्या लहरी निर्माण होत होत्या. त्यातच 'आंबेडकर कौन है, दलितोंका राजा है ', ' आंबेडकर जिंदाबाद, थोडे दिनमें भिमराज ', 'शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचा विजय असो ', ' स्वतंत्र मताधिकार हासिल करो ' अशा प्रमुख जय- घोषांच्या गर्जना होत होत्या आणि सेंट्रल स्टेशनचा दिग्विंभाग सारखा दुमदुमत
होता.
या आवाजाचे पडसाद स्टेशनाबाहेरील राजरस्त्यावर गेल्यामुळे तेथे रेंगाळत असलेल्या हजारो अस्पृश्य लोकांची एकच धावपळ उडाली आणि पुराच्या लोंढ्याप्रमाणे असंख्य माणसांचा लोंढा सेंट्रल स्टेशनच्या आवारात [घुसल्यामुळे ] स्टेशन व त्या लगतचा खुला भाग भरगच्च भरून गेला. स्टेशनच्या गच्च्या, पुलाचे कठडे वगैरेवर लोकांनी अगोदरच गर्दी करून सोडली होती आणि वहानांची रहदारी जेथल्या तेथे स्थगितली होती.
डॉ. बाबासाहेब जनसमुदायाला उद्देशून दोन शब्द बोलावयास उठले. प्रचंड गर्जनांचा व टाळ्यांचा प्रदीर्घ कडकडाट झाला. डॉ. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर दूरच्या प्रवासाचा त्रासिकपणा दिसण्याऐवजी त्यांची मुद्रा प्रस्न दिसत होती. आनंदाची तेजोवलये त्यांच्या चेहऱ्याभोवती विलसत होती.
मुंबईच्या दलित जनतेने केलेल्या या अभूतपूर्व स्वागताबद्दल प्रारंभी मनःपूर्वक आभार मानून, डॉ. बाबासाहेब म्हणाले,
मी दिल्लीहून पराभूत होऊन आलो नाही. परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे सांत्वन करतात, त्याप्रमाणे माझ्या सांत्वनार्थ ही सभा नाही. माझ्या आयुष्यात मी कधी अपेशी झालो नाही. मी माझ्या दलित समाजासाठी गेल्या चार वर्षात जी कामगिरी केली, तिच्याबद्दल हे माझे स्वागत होत आहे, हे माझ्या शत्रुंनी व अस्पृश्य समाजाच्या हितशत्रुंनी ध्यानात ठेवावे. (प्रचंड टाळ्या)