२५-६-१९४६ आम्ही आज कदाचित लढाई हरलो असू, पण युद्ध मात्र आम्ही जिंकणारच जिंकणार - Page 79

आम्ही आज कदाचित . . . . . जिकणारच जिकणार ४१

स्वार्थत्याग करा. अखेर यश तुमचेच आहे. असा स्फूर्तिशाली संदेश देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तेजस्वी भाषण टाळ्यांच्या प्रचंड गजरात व ' जयभीम ' च्या गगनभेदी निनादात संपविले.

शेवटी श्री. मडकेबुवांनी कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे नि लोकसमुदायांचे आभार मानल्यावर लोक आनंदीत अंतःकरणाने व उल्हसित मनाने घरोघर निघून गेले. अशारितीने ही विराट स्वागत सभा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.