१७-१२-१९४६ अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही - Page 96

प८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बळाच्या वापराला माझा पुढचा आक्षेप असा आहे की, प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्ही जे मिळवाल त्याला तुम्ही हानी पोचवाल. तुम्ही जे मिळविता ते त्याच्या मूळ स्वरुपात मिळत नसते, ते अवमूल्यन झालेले, रसातळास गेलेले, उजाड झालेले आणि नाश पावलेल्या स्वरुपात असते. *

हे बहुमोल शब्द आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष घातक होईल.

हिंदू-मुस्लिम समस्या बळाचा वापर करून सोडविण्याची योजना जर कुणाच्या मनात असेल, दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यासाठी युद्धाचा अवलंब करून, मुसलमानांना शरणागती पत्करायला लावून संविधानाच्या अधिपत्त्याखाली आणावयाचे असेल, त्यांच्या संमतीशिवाय तयार .झालेल्या संविधानास शरण जाण्यासाठी त्यांना बाध्य करण्यात येत असेल तर या देशाला नेहमीसाठी याच प्रयत्नात गुंतून राहावे लागेल. एकदा मिळालेला विजय हा कायमस्वरुपी असणार नाही. |

मी आतापर्यंत जेवढा वेळ घेतला त्यापेक्षा अधिक वेळ घेऊ इच्छित नाही आणि पुन्हा बर्कला उद्घृत करुन मी माझ्या भाषणाचा समारोप करीन. बर्कने असे कुठेतरी म्हटले आहे की, 'सत्ता देणे सोपे आहे, शहाणपण देणे कठीण आहे.' या सभेला प्राप्त झालेल्या सार्वभौम अधिकाराचा वापर शहाणपणाने करण्याची आपली तयारी आहे, हे आपण आपल्या आचरणाने सिद्ध करू या. देशातील सर्व घटकांना आपल्या रोबत नेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. एकतेकडे जाण्याचा याशिवाय दुसरा मार्ग नाही. याबाबत आपल्या मनात कुठलीही शंका असता कामा नये. '' १

१ मूळ इंग्रजी भाषणाचा अनुवाद अतिथी संपादक मंडळाने केला आहे.