शेतसाऱ्याचा प्रश्न - Page 101

शेतसाऱयाचा प्रश्न ५७

नाही, याचें प्रत्यक्ष प्रमाण आपल्या अग्रलेखातच पहावयांस सांपडते. त्यात सुरवातीसच आपण म्हटले आहे की, “ जमिनदाराला दिल्या जाणाऱ्या खंडावरून शेतसारा ठरवूं नये. “ असे म्हटल्यास तो कशावरुन ठरवावा याचे उत्तर दिले पाहिजे. हे उत्तर एका अर्थाने कमिटीच्या पहिल्याच प्रश्‍नाच्या उत्तरात येऊन गेले आहे व ते सरकारनेहि तत्वतः मान्य केले आहे. लँड रेव्हिन्यू कोडाच्या १०७ व्या कलमात शेतसारा ठरवितांना शेती जमिनीचे उत्पन्न लक्षात घ्यावे असे म्हटले आहे व ते कलम आपणांस मान्य आहे असा बहुतेक साक्षीदारांनी जबाब दिला आहे. या कलमाच्या बंधनातून निसटून जाण्याचा सरकारचा प्रयत्न चालू असल्याचे उघड दिसून येते. तथापि हे कलम कायम ठेवावे व जरुर तर त्यातील शब्द अधिक स्पष्ट व निस्संदिग्ध करावेत असाच बहुतेक सर्व साक्षीदारांचा अभिप्राय नमूद असल्याचे शेतजमिनीच्या निव्वळ उत्पन्नाच्या अंदाजावरुन कर आकारणी करावी याविषयी कमिटीत फारसा मतभेद होईलसें दिसत नाही. माझ्यामते शेतीच्या उत्पन्नावर शेतसारा बसविणें हे अत्यंत गैर व अन्यायकारक आहे. आधी शेतीचे उत्पन्न ठरविणे हे म्हणण्यासारखे सोपे नाही. खर्च वजा जातां राहील ते उत्पन्न असा ठोकताळा घेतला तरी खर्च आणि उत्पन्न ह्यांचे प्रमाण सर्वसारखेच सांपडणार नाही. कधी कधी समान प्रमाणांत उत्पन्न होण्यास असमान प्रमाणांत खर्च करावा लागतो. असा जेथे प्रसंग येईल तेथे सर्वसाधारण एकच खर्चाचा आकडा धरुन उत्पन्न आकारणें गैर होईल. परंतु ही बाब जरी सोडून दिली तरी शेतसारा शेतीच्या दर एकरी उत्पन्नावर आकारला जात असल्याने हजारो एकर लागवड करीत असून २००० रुपये कमवीत असलेला लक्षाधीश सावकार व अवघा एक एकर पेरा करुन २० रुपये मिळविणारा नांगऱ्या हे सारख्याच प्रमाणात सरकारला कर देतात. ह्या कराचे प्रमाण शेंकडा २५ असे जर धरले तर सावकार अवघा ५०० रुपये कर देतो. पण बिचाऱ्या नांगन्याला ५ रुपये द्यावे लागतात हा न्याय आहे काय ?

कारभाराच्या संबंधाने जे कांही नियम तज्ज्ञांना मान्य झाले आहेत त्यापैकी एक नियम असा आहे की कराचे प्रमाण कर देणाऱ्याच्या मगदुराप्रमाणे असावे आणि मगदूर ठरविताना धंद्याच्या उत्पन्नावरुन तो न ठरविता माणसाच्या ऐपतीवरुन तो ठरविला जावा. कारण प्रपंचाच्या भिन्न स्थितीमुळेच सारखे उत्पन्न असले तरी ऐपत सारखीच आहे असे "हणता येत नाही. हा नियम अंमलात आणावयाचा तर ऐपतीवर कर बसवायचा इतकेच नव्हे तर ऐपतीच्या वाढीबरोबर कराच्या दराचे प्रमाणही वाढत ठेवावे लागते कारण ज्याची ऐपत जास्त त्या मानाने त्याचे समार्थ्य जास्त या नियमानुसार जर आपल्याकडील शेतसाऱ्याच्या पद्धतीची छाननी केली