शेतसाऱ्याचा प्रश्न - Page 102

५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तर तीपासून धडधडीत अन्याय होत आहे हे कोणासही नाकबूल करता यावयाचे नाही. कारण उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिले असता किंवा निर्वाहाच्या दृष्टीने पाहिले असता हे उघड आहे की रुपयांतून ५०० रुपये जर गेले तर सावकाराच्या आर्थिक सामर्थ्याला काही म्हणण्यासारखा धोका पोहोचतच नाही. परंतु तेच नांगऱ्याच्या २० रुपयांतून जर ५ रुपये गेले तर त्याची उद्योग वृद्धी तर होणार नाहीच पण त्याच्या पोटाची खळगी सुद्धा भरणार नाही. कराचे समप्रमाण असल्याने हा अन्याय घडतो हे उघड आहे. वास्तविक पाहिले असता सावकाराची चढती ऐपत असल्याकारणाने त्याने द्यावयाचा कर चढत्या प्रमाणात असला पाहिजे. जोपर्यंत असे झाले नाही तोपर्यंत सावकार आणि नांगऱ्या या उभयतांत न्याय झाला असे केव्हाच म्हणता यावयाचे नाही.

वर सांगितलेल्या नियमाशिवाय सुधारलेल्या राष्ट्रांच्या कर पद्धतीत दुसरा एक सर्वसाधारण नियम दृष्टीस पडतो तो नियम असा की कर देणे हे जरी दरेक नागरिकाचे कर्तव्य आहे तरी सर्वांपासून सरसकट सारखा चोपून कर घेणे राष्ट्राच्या हितावह नाही. सर्वांचे आर्थिक सामर्थ्य सारखे असावे हे तत्व जरी अजुनही सर्वांस मान्य झालेले नाही तरी कोणाचेही आर्थिक सामर्थ्य अमुक मर्यादेच्या खाली असणे हे राष्ट्राच्या संवर्धनास घातक आहे. एवढे मात्र सर्वांस मान्य झाले आहे. या तत्वानुसार दरेक नागरिकाने सरकारला करद्यावा हा जो नियम आहे त्यात एक महत्त्वाचा फेरफार करण्यात आला आहे.

त्या फेरफारान्वये ज्याची ऐपत अमुक एक ठराविक ऐपतीच्या खाली असेल त्यास कराच्या जाचणीतून मुक्त करण्यात येते. म्हणजे त्यास सूट मिळते. परंतु आपल्याकडील शेतसाऱ्याच्या पद्धतीत या नियमास मुळी वावच दिलेला नाही. . शेतसाऱ्याच्या पद्धतीत गरीब आणि श्रीर्मत हे सारखेच चरकास लावलेले दिसतात. आधीच जे दारिद्र्याने गांजलेले आहेत त्यांच्यावर YA: कराचे ओझे देऊन गांजणे हे बुडत्याला लाथ मारुन बुडवण्याइतके घातुक व निष्ठुरपणाचे आहे. नवल आहे की, ज्या नियमाचा उल्लेख मी वर केला आहे ते नियम आपल्याकडील कारभार पद्धतीच्या गुण दोषांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना माहित नाहीत असे नाही. कारण आपल्या देशात उत्पन्नाच्या ज्या इतर बाबी आहेत त्या सर्व बाबींना ते नियम लागू केले आहेत, याला साक्ष आपल्याकडील इन्कम टॅक्सचा कायदा हा होय. असे असता शेतीच्या बाबींस ते नियम लागू न करण्याचे कारण कोणी सांगू शकेल काय ? शेतीच्या बाबतीत व इतर बाबतीत असा पक्षपात असावा व त्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये इतकेच नव्हे तर आहे तो पक्षपात योग्य व रास्त आहे BS Yara मत व्हावे हे शेतकऱ्यांचे