शेतसाय्याचा प्रश्न ५९
दुर्दैव नव्हे काय ? माझ्या मते शेतसाऱ्याच्या पद्धतीचे अनिष्ट परिणाम जर आपणास टाळावयाचे असतील तर आपल्याला शेतीच्या उत्पन्नावर कर बसविणे हे लँड रेव्हिन्यू कोड कलम १०७ मध्ये गोवलेले तत्व झुंगारुन देण्यात यावे याचे स्पष्टिकरण प्रो. सेलीगमन यांनी एके ठिकाणी केले आहे आणि त्यात इस्टेटीवर कर बसविण्याचे ऐवजी निव्वळ उत्पन्नावर आकारण्याचा प्रघात कसा पडत चालला आहे त्याचे विवेचन केले आहे.
ही सुधारणा आपल्याकडे घडवून आणण्यास आपल्या इन्कम-टॅक्स अँक्टातील
कलम ४ पोटकलम ३ बाब ८ रद्द करणे प्राप्त आहे व तीच कलम ६ मध्ये बाब
७ म्हणून घेतली पाहिजे. असे झाल्याने चार महत्वाचे फायदे होतील. (१) शेतीचा कर शेतीच्या उत्पन्नावर न बसवता शेतकऱ्याच्या ऐपतीवर बसविला जाईल. (२) कराचे चढते प्रमाण लागू झाल्याने गरीब व श्रीमंत शेतकऱ्यात जो अन्याय होतो तो टळेल. (३) किमान ऐपतीच्या मर्यादेच्या आतील शेतकऱ्याची कराच्या बोजापासून सुटका होईल व (४) जमिन महसुलाची बाब वसुलीच्या दृष्टीने जमाबंद न राहता तिच्या जमेत एक प्रकारचा लवचिकपणा येईल.
याशिवाय आणखी एक महत्त्वाचा फायदा होईल असे म्हणण्यास काही हरकत नाही. सर्वांना महशूर आहे की, सुधारणेचा कायदा होईतोपर्यंत शेतसारा ही बाब सर्वस्वी कार्यकारी मंत्र्याच्या ताब्यातील आहे असे धरले जात असे. सुधारणेचा कायदा झाल्यापासून ती बाब कायदेमंडळाच्या अंमलाखाली आणावी असे ठरले आहे. परंतु ती कोणत्या त-हेने आणता येईल हा मोठाच प्रश्न आहे. मी सुचविलेली योजना जर घडून आली तर हा प्रश्न आपोआपच सुटतो. कारण शेतीं ही इन्कम टॅक्सच्या बाबींपैकी बाब असे ठरले म्हणजे इन्कम टॅक्सच्या इतर बाबीप्रमाणे ही बाबही कायदेमंडळाच्या अंमलाखाली सहजगत्या येईल. आता शेतसारा ही बाब प्रांतिक कायदेमंडळास सोपवून दिली असल्या कारणाने [तीत ] व तीस लागू पडणाऱ्या दराच्या कोष्टकात फेरफार करण्याचा अधिकार प्रांतिक कायेदमंडळास आहे. असे एक कलम त्या अक्टात किंदा डिव्होल्युशनच्या नियमात घातले म्हणजे सर्व कार्यभाग आटोपल्यासारखा [झाला. ]
आता कदाचित अशी शंका येईल की, शेतकऱ्यांना अशाप्रकारे सूट दिली तर सरकारचे नुकसान होईल. सूट देणे हा न्याय असेल तर सरकारचे नुकसान होते म्हणून सूट न देणे शहाणपणाचे होणार नाही. पण सूट दिल्यामुळे नुकसान होईल अशी भिती बाळगण्याचे काही कारण नाही. कराचा दर चढता केल्यामुळे श्रीमंत शेतकऱ्यांकडून हल्लीच्या पेक्षा जास्त कर घेण्यात येईल व तेणे करुन गरीब