शेतसाऱ्याचा प्रश्न - Page 104

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ६०

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या माफीने होणारे नुकसान भरुन निघेल. शिवाय सुटीच्या बाबतीत इन्कम टॅक्सच्या इतर बाबीला ऐपतीची जी किमान मर्यादा ठरविण्यात आली आहे तीच मर्यादा शेतीच्या बाबतीत ठेवण्याची काही जरुरी नाही त्यापेक्षा कमी मर्यादा ठेवली तरी चालेल. इतकेच नव्हे तर इन्कम CRM इतर बाबींवर जो दर बसविला आहे त्याहीपेक्षा थोडासा जास्त दर शेतबाबीवर ठेवला तर फारसा अन्याय होणार नाही. कारण ज्याप्रमाणे ऐपतदाराचे वर्गीकरण करुन निरनिराळ्या वर्गावर निरनिराळे कर बसविणे गैर होत नाही त्याचप्रमाणे ऐपतीच्या बाबीचे वर्गीकरण करुन निरनिराळ्या बाबींवर निरनिराळे कर बसविणे काही गैर नाही. अशाप्रकारचे भेदाभेद सुधारलेल्या राष्ट्राच्या कारभार पद्धतीत केलेले आपल्या नजरेस पडतात. अशा प्रकारची सुधारणा आपल्याकडील शेतसाऱ्याच्या पद्धतीत झाल्यास तूट येणार नाही. न्याय होईल व गरीब शेतकऱ्याची करांच्या भारामुळे होणारी आपदा वाचेल.

ही सुधारणा घडून येण्यास एका गोष्टीची आवश्यकता आहे वती ही की शेतसाऱ्याच्या बाबीतील आपला दृष्टीकोन प्रथमतः बदलला पाहिजे. शेतसारा कशावर बसवावयाचा या प्रश्‍नासंबंधाने ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की चालू पद्धतीनुसार शेतसारा हा दर एकर जमिनीवर बसवलेला कर आहे. शेतसारा शेतकरी भरतो. हे जरी खरे आहे तरी वास्तविक पाहता तो त्याच्या जमिनीपासून घेता येतो, शेतसारा हा शेतकऱ्यावर बसवलेला नाही तो जमिनीवर बसवलेला आहे. अशी आपली दृष्टी आहे. सुधारलेल्या पद्धतीचा दृष्टीकोन याच्या उलट आहे. त्या पद्धतीत शेतसारा जमिनीवर बसविलेला नसून जमिनवाहकाच्या एकंदर मगदुरावर बसविलेला असतो. या पद्धतीप्रमाणे वस्तु कर देत नाही. माणुस कर देतो असा या सुधारलेल्या दृष्टीचा रोख असतो. म्हणून या सुधारलेल्या पद्धतीत न्याय-अन्यायाचा विचार करावा लागतो. आपल्या असंस्कृत पद्धतीत वस्तु कर देते असे गृहीत धरले गेल्यामुळे न्याय-अन्याय, बरे व वाईट यांचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. कारण नितीचा प्रश्‍न मनुष्यमात्राच्या व्यवहारास काय तो उद्भवतो. जड वस्तूच्या समीकरणात त्याला वाव नसतो. यास्तव वस्तूवर म्हणजे जमिनीवर कर बसविणे आणि माणसावर म्हणजे शेतकऱ्यावर कर बसविणे ह्या दोन अगदी निराळ्या गोष्टी आहेत. व पहिले देखणे हे अगदी भ्रामक असून दुसरेंच काय ते सत्य आहे हा समज पटणे ही सुधारणेच्या मार्गातील पहिली पायरी आहे. ही जाणीव पटली म्हणजे पुढला मार्ग सोपा आहे. हा महत्वाचा भेद साधारण लोकांच्या ध्यानांत तर आला नाहीच पण तो तज्ज्ञांच्या देखील ध्यानांत आल्याचे माझ्या अवलोकनात नाही. हा भेद सध्या