बहिष्कृतांनी ब्राह्मणेतरांवर आरोप केला तर काही वावगे होणार आहे काय ? - Page 107

बहिष्कृतांनी बाह्मणेतरांवर आरोप . . . . वावगे होणार आहे काय? ६३

व तुम्ही दिलेल्या सहभोजनाच्या वचनाची सत्यता पटेल. परंतु यास ब्राह्मणेतर विद्यार्थी कबूल होईनात व उलटपक्षीं तुम्ही आपापसांतच एकमेकांच्या पंक्तीस बसत नाहीं तर तुम्हाला आमच्या पंक्तीस बसण्याचा काय हक्क आहे अशी शक्कल लढवूं लागले. परंतु या युक्तीवादास देखील बहिष्कृतवर्गाच्या विद्यार्थ्यांनी वाव राहूं दिला नाहीं. कारण लगेच नागपंचमीच्या दिवशीं बहिष्कृत समाजांत मोडणाऱ्या सर्व जातींच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने एका पंक्तीस बसून ब्राह्मणेतरांचे तोंड बंद केलें. तरी पण ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांनी आपला सोवळेपणा कायम ठेवून बहिष्कृत विद्यार्थ्यांस दिलेलें वचन पाळण्याचें धैर्य दाखविलें नाहीं. “देशाचे नांव व आपला गांव” ही कुटील नीतिमत्ता ब्राह्मण लोक अमलांत आणतात असा ब्राह्मणेतरांचा ब्राह्मणांवरचा नेहमींचा आरोप बहिष्कृतांनी ब्राह्मणेतरांवर जर केला तर त्यांत काहीं वावगे होणार आहे काय ? बहिष्कृत वर्गानी ब्राह्मणेतर चळवळींत भाग घेऊन त्या चळवळीचा पुरस्कार करावा असें सांगणाऱ्या 'दीनमित्रा' च्या संपादकाला या ट्रेनिंग कॉलेजमध्ये घडलेल्या नीच प्रकाराचा आम्ही आहेर करतो.

oo

आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत ता. ३ एप्रिल १९२७.