बहिष्कृतवर्ग शेणामेणाचा ... . . मर्दुमकी गाजविलेली आहे ६५
अस्पृश्यांच्या उतावीळ कैवाऱ्यांनीं 'घिसाडघाई' चालविली आहे, असा 'भाला'
कारांचा आरोप आहे. 'फाजील उतावळे समाजसुधारक' असें 'भाला' कार
ज्यांना म्हणतात त्यांचा अपराध काय तर ते अस्पृश्यांना पाणवठे खुले ठेवावे, त्यांची
अस्पृश्यता काढून टाकावी आणि त्यांना हिंदूंच्या देवालयामध्ये जाण्यास हरकत
असूं नये असें प्रतिपादितात. 'आस्ते कदम' सुधारकांचे म्हणणे हें की इतर
लोकांच्या मनोभावनांना बिलकूल धक्का न लावतां अस्पृश्यांनी आपली उन्नति
करून घ्यावी. कितीहि वर्षे लोटलीं तरी, ‘अद्यापि अस्पृश्यता निवारण्याचा काळ
आला नाही' या सबबीचा पाढा वाचावयाचा आणि दुसरीकडून अस्पृश्यांविषयीं
पोकळ सहानुभूति दाखवावयाची ! हा लपंडाव यापुढें चालणें शक्य नाहीं. म्हणे,
अस्पृश्यतां आजकालची नाही, ती एका वर्षात जन्मास आली नाहीं, म्हणून ती एका
वर्षात नष्ट होणार नाहीं, तेव्हां कालाची मर्यादा केव्हांहि झालें तरी सारखीच
असणार !' अशा प्रकारचे कोटिक्रम लढविणारांना आमचा असा सवाल आहे
कीं, राजकीय बाबतींत 'स्वराज्या' ची घिसडघाई करांना ही तुमची अक्कल कोठें
जाते ? हजार बाराशे वर्षाची तुमची गुलामगिरीची संवय एकदम कशी नाहींशी
होणार ? जें पारतंत्र्य हजार बाराशें वर्षे तुम्ही भोगीत आहां तें चुटकीबरोबर कसें
, नाहींसें होणार ? तें नाहींसें होण्याला जागृति झाल्यापासून तितकाच म्हणजे
हजार बाराशें वर्षांचा कालावधि जांवयास नको काय? कारण, तुमच्याच ` म्हणण्याप्रमाणे “कालाची मर्यादा केव्हांहि झालें तरी सारखीच असणार !' तुम्ही , स्वराज्याला पात्र नाहीं ही गोष्ट तुमच्या मनोरचनेवरूनच स्पष्ट दिसते ' आहे. ज्या कारणांनी तुम्हीं स्वराज्य गमावून बसलां तीं कारणें आजमितीस
कायम आहेत. फार कशाला, परवांच्या महाड येथल्या दंग्यांतच तुमची
स्वराज्यविषयक नालायकी शाबीद झाली आहे. तुम्ही अल्पसंख्यांक लोकांचे ` नागरिकत्वाचे हक्क कबूल करावयाला तयार नाहीं, गरीब दुबळ्या लोकांशीं ` न्यायपूर्वक वागण्याची तुमची इच्छा नाहीं, आणि हिंदुराज्य झालें असतें तर
बहिष्कृत वर्गाची पुरी कम्बखती भरली असती. कलेक्टर यूरोपियन,
डि.पो.सुपरिंटेंडंट यूरोपीयन आणि पोलिस इन्स्पेक्टर मुसलमान असे अधिकारी
नसते आणि महाडच्या मुसलमानांनी आपआपल्या घरांतून बहिष्कृत वर्गातल्या
्त्रीपुरुषमंडळीला व मुलांना आसरा दिला नसता तर स्पृश्यवर्मीय म्हणविणाऱ्या
हिंदूंनी अत्याचारांची कमाल केली असतीं. इतके असूनहि “स्वराज्य हा माझा
जन्मसिद्ध हक्क आहे" असें म्हणण्याला तुम्हांला शरम वाटत नाहीं. जणूं काय,
स्वराज्य हा तुमचाच हक्कं जन्मसिद्ध आहे, आणि महार चांभारांना कसलेच हक्क
+ ह्या वाक्याचा उच्चार लो. बाळ गंगाधर टिळकांनी वऱ्हाडातील स्वराज्याच्या मोहिमेत
अकोट येथे १९१८ साली केला. पुढे हाच राष्ट्रमंत्र म्हणून टिलकानुयायी स्वराज्यवाद्यांनी
सदोदित मनात जपला.-गणवीर, स्फूटलेख पृ. ४.
डब्ल्यू-२०७३-५ अ