६६ डौँ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नाहींत ! तुम्हीं जे तुकडे तोंडावर टाकाल ते चघळीत महारचांभारांनी समाधान मानलें पाहिजे तर मग तुम्हीहि सरकार मेहरबानीने जे हक्क तुम्हालां देतें त्यांवर संतुष्ट राहून स्वस्थ कां बसत नाहीं ? धिम्मेपणाचा उपदेश तुमच्या घिसाडघाईच्या राजकीय चळवळीसहि लागू नाही काय ? घिसाडघाई नको तर ती कोठेच नको. राजकीय बाबतीत इष्ट असेल तर सामाजिक बाबतीत त्यापेक्षाही ती इष्ट आहे. राजकीय बाबतीत शर्यतीच्या घोड्याप्रमाणे धावावयाला पाहावयाचे आणि सामाजिक व धार्मिक समतेचा प्रश्न निघाला कीं, गोगलगाईपेक्षांही सावकाश चालण्यानेच खरी प्रगति होईल असें मोठ्या शिष्टपणाचा आव आणून सांगावयाचें, हें निव्वळ ढोंग आहे. या ढोंगाला अस्पृश्य केव्हांही भीक घालणार नाहींत. 'भाला' कार अस्पृश्यांविषयीं आपली सहानुभूति आहे म्हणून दाखवितात, परंतु त्या सहानुभूतिची कवडी इतकीहि किंमत नाहीं. वरकांती त्यांनीं सहानुभूति दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याच लेखांत त्यांच्या पोटांतलें कालकूट बाहेर पडलें आहे. लोकांच्या मनोवृत्ति दुखवूं नका, म्हणून अस्पृश्यांना व त्यांच्या
HAA उपदेशं करणाऱ्या या ढोंगी लोकांना आम्हीं विचारतों, तुमच्या अठरा
कोटी लोकांना तेवळ्यां मनोवृत्ति आहेत आणि सात कोटी अस्पृश्यांना मनोवृत्ति नाहींत ? आधीं लोकांवर जुलूम करून त्यांना इहलोक नरकतुल्य करावयाचा आणि मग त्यांना त्या रीतीनें वागविणें हा आपला हकक आहे असें म्हणून त्या
Som धक्का लागण्याचा संभव दिसल्याबरोबर आपल्या मनोवृत्ति दुखावल्या
गेल्या म्हणून ओरड करावयाची ! तुम्हीं इंग्रजांच्या मनोवृत्तींना धक्का कां लावतां ? हिंदी लोक हे जित अतएव पारतंत्र्यांतच रहाण्यास योग्य अशी इंग्रजांची भावना आहे आणि हिंदी लोकांनी मोठमोठ्या अधिकाराच्या जागा मिळवून इंग्रजांच्या बरोबरींनें वागण्याचा प्रयत्न केल्यामुळे इंग्रजांच्या मनोवृत्ति दुखणे स्वाभाविक नाहीं काय? लोकांच्या मनोवृत्ति दुखवूं नका असें 'परोपदेश पांडित्य. करणाऱ्या या 'देशभक्तांनी' लोकांना “तुमच्या या भावनाच चुकीच्या आहेत, माणुसकीचे हक्क सर्वांनाच मिळाले पाहिजेत, इतरांना तुच्छतेनें वागविण्याचा कोणासही हक्क नाहीं, आतांपर्यंत अन्याय झाला म्हणून चालू वहिवाटीच्या सबबीवर त्याला र््यायाचें स्वरुप प्राप्त होत नाहीं,”” असें स्पष्टपणें सांगून त्यांची कानउघडणी करावयास नको काय ? पण तशी कानउघडणी केली तर सवंग लोकप्रियता कशी मिळेल ? जातिवर्चस्व मिरविण्याची हौस कशी भागवितां येईल ? अज्ञ लोकांना योग्य शिकवण द्यावयाचीं नाहीं, एवढेंच नव्हे तर अज्ञलोकांचे नांव पुढें करून आपणच न्यायाच्या व योग्य चळवळीला विरोध करावयाचा, हीं महाराष्ट्रातली गेल्या चाळीस वर्षातली परंपरा आहे. 'भाला' कार त्याच तालमीत तयार झाले आहेत. परंतु त्यांनीं व त्यांच्या संप्रदायबंधूंनी खूप
डब्ल्यू-२०७३-५ ब