१९
अस्पृश्यांनी गळ्यांत जानवें घालणें हा अधर्म . . .
महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह केल्यामुळे स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांवर जो अत्याचार केला तशाच प्रकारे इतरत्र जे अत्याचार केले जातात त्याचा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर खालील प्रमाणे देतात, : संपादक.
अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांवर कसे अत्याचार होतात याचा एक दुसरा पुरावा पाहिजे असल्यास मध्यप्रांतांत एका ठिकाणीं तो नुकताच घडून आला आहे. सतनामी नांवाचा एक पंथ तिकडे असून त्या पंथामुळें अस्पृश्य समजलें जाणाऱ्या लोकांच्या राहणींत पुष्कळ सुधारणा झाली आहे. या पंथाच्या एका चांभारानें गळ्यांत जानवें घातलें म्हणून जवळपासच्या गांवांतल्या ब्राह्मणांनी व रजपुतांनीं कट करून त्याला एकटेपणीं Tiss त्याचा खून केला, अशी बातमी हल्लींच प्रसिद्ध झाली आहे. चांभारानें जानवें घातलें म्हणून ब्राह्मणांच्या व रजपूतांच्या धर्माच्या गळ्याला फांस कां लागावा ? अस्पृश्यांनी गळ्यांत जानवें घालणें हा अधर्म आणि ब्राह्मणांनी व रजपुतांनीं त्याला एकटा गांदून त्याचा खून करणें हा धर्म ! अशा मनोभावनांचे चोचले किती करावयाचे ? [थोडक्यांत ] सांगावयाचे म्हणजे ब्राह्मणक्षत्रियांचा धर्माभिमान व [शौर्य ] [हीं ] [फक्त ] [अस्पृश्यांवर ] गाजविण्यासाठीं आहेत. हे लोक युरोपीयनांचे बूट चाटतील, मुसलमानांचे [नांव ] ऐकल्याबरोबर पळ काढतील, पण अस्पृश्यांवर [वर्चस्व ] [गाजविणें ] [हा ] [यांचा ] [व ] [यांच्या ] बापजाद्यांचा हक्क ! या लोकांना 'स्वराज्य' शब्द उच्चारावयाला खरें [म्हटलें ] [असतां ] शरम वाटली पाहिजे. गुलामांची जात आणि पुनः नाक वर आहेच [! ]
2.1. 21110 ga Nob वा म त RRR आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३ एप्रिल १९२७.