पुनश्च : हरि : ॐ ! - Page 114

२०

पुनश्चः हरि: ३? !

प्रस्तुतच्या लेखकानें तारीख ३१-१-२० पासून “ मुकनायक.“ या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्र चालूं केलें होतें. सदरील वृत्तपत्रासंबंधीं आपलें मनोगत व्यक्त करितानां, त्याने पहिल्या अंकांत असें म्हटलें होतें की, '' आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढें होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेंच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच नाहीं. परंतु मुंबई इलाख्यांत निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिलें असतां असे दिसून येईल कीं, त्यांतील बरीचशी पत्रें विशिष्ठ अशा जातीचे हितसंबंध पहाणारी आहेत. इतर जातींच्या हिताचीं त्यांना परवा नसते. इतकेंच नव्हें तर केव्हां केव्हां त्यांना अहितकारक असेंहि त्यांतून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इषारा आहे कीं कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतींचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहाणार नाहीं. समाज ही एक नौकाच आहे, व ज्याप्रमाणें आगबोटींत बसून प्रवास करणाऱ्या उतारूनें जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावें म्हणून म्हणा किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गम्मत पाहाण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडलें तर सर्व बोटीबरोबर त्यालाहि झाधी किंवा मागाहून जलसमाधि ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार, यांत बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपलें हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणावयाचे. दीनमित्र, जागरूक, डेक्कनरयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश व सुबोधपत्रिका वगैरे पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्‍नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्‍नांचा ज्यात खल होतो, त्यांत बहिष्कृतांच्या प्रश्‍नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही हेहि पण उघड आहे. अशा या अति बिकट स्थितिशी संलग्न असलेल्या प्रश्‍नांची उकल करण्यास एक स्वतंत्रच पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे. खास अस्पृश्यांच्या हिंताहिताची चर्चा करण्यासाठी “ सोमवंशीय मित्र “, “ हिंद नागरीक,“ “facies विध्वंसक “, ही