पुनश्च : हरि : ॐ ! - Page 115

पुनश्चः हरि:39 ! ७१

पत्रें उपजली व लयही पावली. परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास “ मूकनायक “ न डगमगता स्वजनोद्धाराचें महत्कार्य करणारांस योग्य पंथ दाखविल, असें आश्वासन देताना तें अनुभवाअंति खोटे ठरणार नाहीं अशी खात्री बाळगून हें स्वाशयनिवेदन आटोपते घेतों. “

प्रस्तुतच्या लेखकानें या उताऱ्यांत जाहीर केलेला हा संकल्प फार दिवस . टिकला नाहीं याबद्दल त्यास खेद वाटतो. पण हा संकल्प सिद्धीस गेला नाहीं यांत त्याचा दोष नाहीं, हें ज्यांस खरी परिस्थिति ठाऊक आहे त्यांस अवगत आहेच. पत्राचा उपक्रम सुरूं केल्यानंतर प्रस्तुतच्या लेखकास असें दिसून आलें कीं, अशा प्रकारचा लोकसेवेचा मार्ग पत्करणे झालें तर त्याकरितां कोणता तरी एखादा स्वतंत्र धंदा हस्तगत करणें अवश्य आहे. त्यास अनुसरून सुसाध्य असा ब्यारिस्टरी सारखा स्वतंत्र धंदा करतां यावा म्हणून आपला अवशेष राहिलेला अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी त्यास परत विलायतेस जाणें भाग पडलें. जातांना त्यानें वृत्तपत्राच्या कार्याचीं सूत्रें कांहीं दिवस त्याच्या तालमीत राहिलेल्या एका तरुणाच्या हातीं दिली. प्रस्तुतच्या लेखकास आशा होती कीं, अभ्यासक्रम संपवून परत आल्यावर सदरील वृत्तपत्र भरभराटीस आलेलें आपल्या दृष्टीस पडेल. पण त्याच्या कमनशीबानें ती आशा व्यर्थ ठरली. कारण परत येण्यास निघण्यापूर्वीच पत्राला मूठमाती मिळाल्याची बातमी त्यास कळली. अंगीकृत कार्याचा अशा रीतीनें अल्प काळांतच नाश झालेला पाहून ज्याचें त्यास वाईट वाटणें साहजिकच आहे. ह्या नाशांचीं कारणें जनतेपुढें मांडून त्यांच्या खरेखोटेपणाची छाननी करीत बसण्यांत प्रस्तुतच्या लेखकास काहीं अर्थ दिसत नाहीं. परंतु

आज जवळ जवळ सहा वर्षाच्या कर्मलोपानंतर जुन्या स्वाध्यायास नव्या नांवाखाली

पुन्हा सुरवात प्रस्तुतचा लेखक कां करीत आहे, यासंबंधीं खुलासा केल्यास वावगे होणार नाहीं असें वाटतें.

सहा वर्षापूर्वी प्रस्तुतच्या लेखकानें “ मूकनायक “ पत्रास सुरवात केली तेव्हा राजकीय सुधारणेचा कायदा अमलांत यावयाचा होता. त्यास अनुसरून वृत्तपत्राची जरूरी काय आहे याचें दिग्दर्शन करताना प्रस्तुतच्या लेखकाने असें म्हटलें होतें की “ जर या हिंदुस्थान देशांतील सृष्ट पदार्थांच्या व मानव जातींच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्यानें पाहिलें. तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे असें निःसंशय दिसेल.

ka * * *

“ हिंदु धर्मीयांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निंदास्पदही आहे. कारण विषमतेनुरूप होणाऱ्या परस्परांच्या व्यवहाराचे स्वरुप हिंदुधर्माच्या शीलाला शोभण्यासारखें खास नाहीं. हिंदुधर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्चनीच भावनेने प्रेरित झाल्यां आहेत हें उघड आहे, हिंदू समाज हा एक