पुनश्च : हरि : ॐ ! - Page 117

पुनश्चः हरि:ॐ | ७३

धर्मभावनेच्या Baer जखडून घेऊन शत्रूस मित्र समजून त्यांच्यापायी इतर जन लीन कां झाले याचा उलगडा करण्यास फार दूर जावयास नको. अज्ञानी लोकाकडून कांहीहि करविता येईल आणि म्हणूनच ज्ञानसंचय-प्रसार नव्हे-ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माचे मोठे तत्व बनवून ठेवण्यात आले आहे.

““ सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नति खुंटली, हे निर्विवाद आहे, परंतु त्यांच्या दु:खांत दारिद्र्याची तरी भर पडली नाही. कारण शेती, व्यापार, उदीम अथवा नोकरी करुन आपला चरितार्थ चालविणे त्यांना दुरापास्त नाही; पण या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे. दौर्बल्य, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहवत आहे हे खास. दीर्घकाल अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचीत आहे. आहे ती स्थिति योग्य आहे यापेक्षा बरी स्थिति आपल्या नशिबी नाही अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजनच नाही. पण तें अंजनहि

आजकाल मिरची मसाल्याप्रमाणें विकत घ्यावे लागत आहे ; आणि दारिद्र्यामुळे

ते दुर्मिळ झालें आहे. कोठे कोठे तर विकत घेऊं गेलों असतां ते मिळतहि नाही, कारण ज्ञानमंदिरात सर्वच ठिकाणी अस्पृश्यांचा प्रवेश होतो असें नाही. दारिद्र्याची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळविण्यास हवी तेवढी संधि किवा मोकळीक नाही. नोकरी, व्यापार, उदीम इत्यादि धंद्यात त्यांना क्वचितच रिघाव होता ; नशीब काढण्यास कोठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे. “

““ प्रचलित हिंदू धर्माच्या अति घोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचें महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधि अविवेकी

व दुराग्रही जन जोंपर्यंत या देशांत वावरत आहेत तोपर्यंत आपला समाज निकृष्ट

स्थितीमध्येंच खितपत रहाणार आहे, याची जाणीव या बहिष्कृत समाजातील बऱ्याच लोकांस झाली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. तसेंच परस्थ सरकारास आपल्या GM वागावे लागत आहे याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितीविषयी वरिष्ठ हिंदूंक डून त्याचा कसा गैरसमज करुन देण्यांत येत आहे हें देखील त्यांना कळून चुकलें आहे. जातिभेद व जातिमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या या देशांत खरें स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधीतर्फे राजकीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. एवंच राजकीय सत्ता मिळवून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहाणारांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे, ही त्यांच्यांत उपजलेल्या जागृतीची साक्ष होय. ”