राष्ट्रीयदृष्ट्या देशाचा कारभार एका जातीच्या हाती जाणें अनिष्ट. - Page 121

राष्ट्रीयदृष्ट्या देशाचा . . . . जातीच्या हातीं जाणें अनिष्ट ७७

वस्तु कोणती. असें जर आम्हांस कोणी विचारलें तर ती पुस्तक म्हणून आम्ही निर्भयपणे सांगू. यावरुन उघड आहे की, जे लोक शिक्षण घेतात तें फक्त शिक्षण म्हणजे एक धंदा आहे म्हणूनच घेतात. शिक्षणाने प्राप्त होणारा धंदा हेच त्यांच्या उच्च शिक्षणाचे मुख्य कारण आहे. शिक्षणाने धंदा प्राप्त झाला नाही तर फारच थोडे लोक उच्च शिक्षणाच्या भानगडीत पडतील यांत संशय नाही.

अस्पृश्य वर्गात शिक्षणाचा प्रसार करावयाचा असेल तर त्यांच्यांतील पदवीधरांस वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्या खुल्या करण्यांत आल्या पाहिजेत. त्या जर पूर्वीप्रमाणेच बंद राहिल्या तर शिकून कांही उपयोग नाही असे समजून त्यांच्यात कोणी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त होणार नाही. आज जे कांही अस्पृश्य वर्गातील तरुण आपल्या दारुण परिस्थितीशीं झगडा करून कॉलेजची पायरी चढले आहेत त्यांना आपणांस एक उच्च प्रतीचा धंदा हस्तगत होईल या आशेशिवाय दुसरें उत्तेजक असें कारण कांहींच नाही. रा. जाधव यांच्या प्रकरणाचा जो शेवट झाला त्यापासून त्यांचे व्यक्तिशः नुकसान झालेंच आहे. तेवढ्यावरच जर भागतें तरी बरें. परंतु आम्हांला जे भय वाटतें तें हें कीं, रा. जाधव यांच्यापाठीं वाट चालत असलेले अस्पृश्य विद्यार्थी आशेचा भंग झाल्यामुळे निराश होऊन पुढचा मार्ग आक्रमणें सोडून देतील. असें झालें तर या परिणामाचें खापर सरकारच्या माथी फोडल्याशिवाय गत्यंतर नाही. अस्पृश्यांच्या उन्नतीच्या संबंधात आमच्या इंग्रज सरकारच्या धोरणाचा आम्हास कांही थांगपत्ताच लागत नाही. नोकऱ्या मिळत नाहींत म्हणून अस्पृश्यांनी जर ओरड केली तर त्यांना सरकारतर्फे सांगण्यांत येतें, ' की तुमच्यांत लायक इसम नाहींत. ' लायकीचा इसम हजर केला असतांना नोकरी कां दिली नाहीं, म्हणून कौन्सिलांत प्रश्‍न विचारला तर ' कारण सांगता येत नाही ' म्हणून उत्तर देण्यांत येतें. हा प्रकार विलक्षण नाहीं असें कोण म्हणेल ? खरें म्हटलें असतां अस्पृश्यांसारख्या दीनदुबळ्या समाजास लायकीची विशेष कसोशी न करता वरच्या दर्जावर चढविणें आमच्या मतें गैर होणार नाहीं. परंतु लायकी असतांना देखील जर त्यांना वरच्या दर्जाच्या जागां सरकार देत नाही तर अर्थात्‌ अस्पृश्य वर्गाची उन्नती हें सरकारचे ध्येय नाहीं असेंच म्हणावे लागते. रा. जाधवांना जागा न देण्याचें खरें कारण सरकारनें जर सांगितलें असतें तर सरकारचें अस्पृश्यांसंबंधीचें धोरण काय आहे याचा उलगडा तरी झाला असता. सरकारदरबारी अस्पृश्यता पाळली जाणार नाहीं असे सांगणाऱ्या सरकारच्या वचनावर आमचा आजवर भरंवसा होता. पण तो अस्थानी आहे असें आम्हांस आता वाटूं लागलें आहे. रा. जाधवांना जागा देण्यांत आली नाही याचें कारण ते अस्पृश्य आहेत हेंच असावें असें आमचें ठाम मत आहे. कारण या