आपल्या लोकांचे हित अस्पृश्यांच्या प्रतिनिधीने विसरता कामा नये. - Page 125

२२
आपल्या लोकांचे हित
अस्पृश्यांच्या प्रतिनिधीने विसरता कामा नये.

नवीन सुधारणेचा कायदा अंमलात आल्यानें या देशांत प्रजासत्ताक राज्यपद्धतीस सुरवात झाली असें म्हणण्यास कांहींच हरकत नाहीं. ही नूतन राज्यपद्धति पायाशुद्ध असावी म्हणून, या देशांतील प्रजेचे जे अनेक वर्ग आहेत त्या वर्गाचे प्रतिनिधि कशारीतीने व कोणत्या प्रमाणांत घ्यावेत यासंबंधाने बरीच वाटाघाट झाली. शेवटी कांही वर्गाचे प्रतिनिधि नेमणुकीनें, तर कांहीचे निवडणुकीने घेण्यांत आले. त्यांत अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधि नेमणुकीनें घेण्याचे ठरले. खरे म्हटले असतां अस्पृश्यांचे प्रतिनिधि सुद्धां निवडणुकीनेंच घ्यावयास पाहिजे होते; पण तसें जरी कांहीं कारणांमुळे करतां आले नाही, तरी [त्यांचे ] प्रतिनिधि त्यांच्या संख्येच्या व त्यांच्या परिस्थितीच्या प्रमाणांत घ्यावयास पाहिजे होते. पण दोन्ही बाबतींत त्यांची त्यांच्याविषयी कळकळ बाळगणाऱ्या सरकारने निराशा केली. प्रांतिक कौन्सिलांत जेमतेम एक एक दोन दोन प्रतिनिधि घेण्याची व्यवस्था केली होती. केंद्रीय असेंब्लीमध्यें त्यांचे प्रतिनिधि घेण्याची कांहींच व्यवस्था करण्यांत आली नव्हती व असेंब्लीच्या पहिल्या सहा [वर्षाच्या ] कारकीर्दीत अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधि नव्हता, असेंब्लींत अस्पृश्यांच्या हिताहिताचे प्रश्‍न उपस्थित होत नाहींत [असें ] [नाहीं. ] पण सरकारला अस्पृश्यांच्या मागणीची कोठे किंमत वाटते आहे ! किंमत जर वाटती [तर ] [संख्येने ] [मुसलमान ] समाजाइतका व बलाने सर्वपिक्षा हतबल अशा [समाजाला ] [अगदी ] [म्हणून ] [अगदींच ] उघड्यावर कसा टाकला असता ? परंतु एकदाची आमच्या कनवाळू सरकारची आमच्या गरीब अस्पृश्य समाजावर [कृपादृष्टि ] [झाली ] [व ] [असेंब्लींत ] [एक ] [जागा ] अस्पृश्यांस चालू सालापासून [देण्यांत ] [आली. ]

ह्या बहुमानाच्या जागेवर मद्रास येथील अस्पृश्यवगाचि पुढारी रा. ब. एम. सी. राजा यांची नेमणूक करण्यांत आली आहे. याबद्दल मि. राजा यांचें आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करितों. पण मि. राजा यांनी असेंब्लींत बजेटवर बोलतांना

आपली नेमणूक केल्याबद्दल अस्पृश्यवर्गातफें सरकारचे आभार मानले याचें कारण

मात्र आम्हांस कळत नाही. मि. राजा यांच्या अल्पसंतुष्टपणाची आम्हांस कीव येते. असेंब्लीत एकंदर १४४ सभासद आहेत त्यापैकी अस्पृश्यांना एक देऊन

डब्ल्यू-२०७३-६ अ