आपल्या लोकांचे हित . .... विसरता कामा नये. ८३
कैवारी कायदे कौन्सिलात असावेत म्हणून जोराची मागणी करण्यांत येते. परंतु जर कायदे कौन्सिलांत पाठविलेले प्रतिनिधि आपल्या कर्तव्यापेक्षा कृतज्ञतेलाच विशेष महत्व देऊ लागले तर त्यांचा गरीब जनतेला काय उपयोग ? कृतज्ञता हा मोठा गुण आहे हे आम्ही कबूल करतों. पण गुणाची वाढ मर्यादेच्या बाहेर गेली म्हणजे तो अवगुण ठरतो. त्याच न्यायानें कृतज्ञतेला सीमा असलीच पाहिजे. जर कां कृतज्ञतेसाठी देशभक्त देशाचे स्वातंत्र्य हरण करण्यास सिद्ध होणार नाहीं, किंवा एखादी पतिव्रता आपल्या पातिव्रत्याचा भंग होऊं देण्यास तयार होणार नाहीं मग कौन्सिलांतील प्रतिनिधीनेंच कृतज्ञतेच्या पायी आपल्या प्रजेच्या हिताची आहुती कां द्यावी ? बरे, मि. राजा यांनी सरकारच्या विरूद्ध मत दिलें असतें तर त्यापासून सरकारचा कांही तोटा नव्हता. मिठावरचा कर १० आणे ठरला असता तरी सरकारला खर्चाला कांही तूट पडत नव्हती. असें असतांना जर मि. राजा गरिबांवरील करांचा बोजा सरकारला कमी करावयास लावण्याचे धैर्य दाखवित नाहीत तर दुसऱ्या कोणत्या प्रसंगी ते दाखवितील म्हणून म्हणावें? एकाच प्रसगांवरून आम्ही त्यांची पारख करूं इच्छित नाही पण अशा वर्तनानें ते आमची निराशा करतील असें भय वाटल्यावरून वेळींच इशारा देत आहोंत.
SR oe Sl ir i tit i
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. २२ एप्रिल १९२७.