२३
महाड येथील धर्मसंगर
व
वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी.
कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचें अधिवेशन संपल्यानंतर महाड येथील ब्राह्मण्यग्रस्त हिंदू गावगुंडांनी केलेल्या दंग्याची हकीकत आम्ही ' बहिष्कृत भारता ' च्या मागल्या अंकीं दिली होती. महाड म्युनिसिपालिटीनें सार्वजनिक ठरविलेल्या चवदार तळ्यावर पाणी भरल्यामुळे मारहाण झाली ही बाब केवळ पाण्याची सोय या दृष्टीने शुल्लक आहे, असे कदाचित म्हणतां येईल, व ' मालाकारा ' प्रमाणे ती नळ लावून अगर अन्य प्रकारचे सोंवळे उपाय योजून मिटवितां येईल. पण दुसऱया दृष्टीनें ही बाब शुल्लक नसून अत्यंत महत्वाची आहे. कारण एका मोठ्या प्रश्नाशीं तिचा संबंध पोहोंचतो. अस्पृश्य लोक पाणी घेण्याकरितां चवदार तळ्यावर गेले म्हणून मारामारी झाली असें म्हटल्याने घडलेल्या प्रकाराचे खरें स्वरुप उघड होत नाही. झालेल्या प्रकाराचें खरें स्वरुप अगदी निराळें आहे. त्यास दंगा म्हणण्यापेक्षां धर्मसंगर म्हणणे जास्त यथार्थ होईल असें आमचें मत आहे. कारण हिंदुसमाजाचे घटक व हिंदुधर्माचे अनुयायी वा नात्यानें, इतर हिंदु जातींच्या मानाने आपण सारख्या योग्यतेचे अधिकारी असून, आपले हक्क सारखें आहेत किंवा नाहींत, हें ठरविण्या विषयीचा प्रश्न या पाणी-प्रकरणाच्या मुळाशीं होता हें खास. या प्रश्नास महाड येथील वरिष्ठ
fee धिंगाणा करून नकारार्थी उत्तर दिलें हें आतां जगजाहीर झालें
आहे. वरिष्ठ हिंदूंच्या या दुष्ट वर्तनाचा आम्हांस तरी मोठा अचंबा वाटतो. इतर देशांत अशा प्रकारचे धर्मसंग्राम झाले नाहींत असें नाही. परंतु ते सर्व विचारभेदामुळे झाले होते. या देशांत वैदिकधर्मानुयायी व बौद्धधर्मानुयायी, तसेंच युरोपांत हीदन व खिस्ती, खिस्ती व महंमदी यांच्यामध्ये जी धर्मयुद्धे वेळोवेळी झाली, त्यांना उभय धर्मातील विचारभेदच कारणीभूत झाला होता. परंतु, महाड येथील धर्मसंगर हिंदुधर्माच्या तत्वाविषयीं मतभेद उत्पन्न झाल्यामुळें झाला, असें म्हणता येणें शक्य नाहीं. महाड येथील धर्मसंगरांत उभयपक्षाचे लोक धर्म सांप्रदायाच्या दृष्टीने एकच होत हें निर्विवाद आहे. असें असतांना कांही घर्मबंधूंनी आपल्या दुसऱ्या धर्मबंधूस ' तुम्ही सामाजिकदृष्ट्या आमच्या खालचे आहांत ' ' तुमच्या संसर्गाने आमचा अधःपात होईल ' हें सिद्ध करण्यास दंडेली