महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. ८५
करावी, हें पाहून कोणाही परकीय माणसास विस्मय वाटेल याबद्दल शंका नाही. पाश्चिमात्य राष्ट्रांत सामाजिक समतेस केव्हांच अधिष्ठान प्राप्त झालेलें आहे. मी इतरांच्या बरोबरीचा तर आहेच, पण त्यापेक्षा लाख दरजे बेहत्तर आहे, अशी दरेकाची भावना असते. कोण कोणाच्या वरचा नाही, व कोण कोणाच्या खालचा नाहीं, अशा समबुद्धीनें सामाजिक व्यवहारांत दरेक व्यक्तीची नांदणूक असते. मतदानाच्या हक्कांच्या विस्तृततेमुळें राजकीय समताही स्थापन करण्यात आली आहे. तेणेंकरून कोणी कोणावर राज्य करतो ही भावना नष्ट होऊन तिच्या ऐवजी आपण करू तसें राज्य ही भावना अधिष्ठित झालेली दृष्टीस पडते. इतकेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या एक दुसऱ्याच्या समान असतां आर्थिकदृष्ट्या एक दुसऱ्याच्या असमान कां असावा, अशा वादास तेथें सुरवात होवून सामाजिक व राजकीय समानतेच्या [पाठोपाठ ] आर्थिक समानता प्रस्थापित होण्याची सुचिन्हें तेथें दिसूं लागली आहेत. खरें म्हटलें असतां, खिस्ती किंवा मुसलमानी धर्मशास्त्रे [हें ] [समानतेच्या ] [तत्त्वांचा ] पुरस्कार करणाऱ्यापैकीं नव्हत. त्यांच्या तत्त्वज्ञानाची मर्यादा अगदी आकुंचित आहे. सारीं माणसे ईश्वराची लेकरे आहेत व परमेश्वराच्या दृष्टीला ती समसमान आहेत एवढेंच काय तें त्यांचें सांगणें आहे. माणसें ही आपापसांत एकमेकांच्या दृष्टीने समसमान आहेत इतकें प्रतिपादण्यापर्यंत [त्यांची ] मजल [गेलेली ]
नाही.
हिंदु धर्माचा सिद्धांत .
खिस्ती व महंमदी धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीनें समतेच्या तत्त्वाला पोषक आहे. माणसे ईश्वराची लेंकरें आहेत एवढ्यावरच न थांबतां ती ईश्वरांचीच रुपें आहेत असें मोठ्या निर्भीडपणे हिंदुधर्म सांगत आहे. जेथें सारींच ईश्वराची रुपें आहेत तेथें कोणी उच्च कोणी नीच असा भेदभाव करणें शक्य नाहीं, हें त्या धर्मांचे एक महान ओजस्वी तत्त्व आहे हें कोणासही नाकबूल करतां यावयाचे नाही, समानतेचें साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षां दुसरा मोठा आधार सांपडणे कठीण दिसतें. असें असतांना जी सामाजिक समता खिस्ती व महंमदी राष्ट्रांतून दिसून येते तिचा हिंदु समाजांत कोठे मागमूसही नसावा, व ती प्रस्थापित होण्याचे पवित्र प्रयत्न चालू असतां हिंदुधर्मीय म्हणविणाऱ्या लोकांकडून अडथळा करण्यांत यावा, यावरून हिंदुधर्मीय लोकांस खऱ्या हिंदुधर्माची किती थोडी ओळख
RE NNO आहे हें दिसून DERE येते. SPECK SSNS SF
†पाहा, परिशिष्ट क्रमांक-२.