८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
एकधर्मीय लोक विधर्मी लोकांप्रमाणे एकमेकां संबंधानें अशा प्रकारें द्वैतभाव बाळगतात. याचे समर्थन करतांना हिंदुधर्माभिमानी लोक असा मुद्दा मांडतात कीं, हिंदुधर्माचीं दोन अंगे आहेत. एक तत्त्वज्ञान व दुसरें आचार. त्यापैकी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान असले तरी आचाराच्या दृष्टीने ते असमान-नव्हे-अपवित्र आहेत. म्हणून त्यांच्याशीं व्यवहांर करणें, हा अधर्म होय ! रुढीर्बलीयसी असें म्हणून जर धार्मिक बाबतींत तत्त्वज्ञान झुगारून द्यावयाचें व नुसता आचार पाळावयाचा, हेंच रास्त आहे, तर राजकीय बाबतींतही तोच न्याय कां लागू नसावा ? राणीच्या जाहीरनाम्यांतील तत्त्वे अंमलात आणणें अशक्य आहे, असे जर एखाद्या कर्झनसाहेबासारख्या कट्टर साम्राज्यवाद्यानें म्हटलें असता जे लोक संतापून
नुसती तत्त्वें काय चाटावयाची आहेत ?
अशी हाकाटी करून नंगा नाच नाचण्यास कमी करीत नाहींत, त्याच लोकांनी आचारात्मक धर्माला प्राधान्य देऊन वेदांत उर्फ तात्विक धर्म व्यवहाराला उपयोगी नाहीं असें म्हणावें हा निर्लज्जपणा नव्हे काय ? धर्माची वरीलप्रमाणें दोन अंगे आहेत हें मत जरी मान्य केलें तरी कोणत्याही धर्माचा आचारात्मक भाग त्या धर्माच्या तत्त्वज्ञांनावरच अधिष्ठित असला पाहिजे, हें विसरतां कामा नये. तसें जर नसेंल तर त्या धर्माला अंतिम ध्येय नाही असेंच म्हणावें लागेल. समाजाचा आचारात्मक धर्म जर त्या समाजाच्या विचारात्मक धर्माच्या नांगरास जखडलेला नसेल तर तो समाज होकायंत्राशिवाय समुद्रांत लोटून दिलेल्या एखाद्या जहाजाप्रमाणें कोठे वहात जाईल, व कोणत्या खडकावर आदळेल, याचा नेम नाहीं. या न्यायाने पाहांता वेदांतांत जर नीतीचे व धर्माचे सिद्धांत, सांगितलेले आहेत, व्यवहारांत जर नीतीची व धर्माची आवश्यकता असेल तर वेदांतधर्म व्यवहारोपयोगी नाहीं असें म्हणण्याऐवजी तो व्यवहारोपयोगी करण्याचे धैर्य या दुबळ्या लोकांत नाही, असेंच म्हटले पाहिजे | आम्ही असे म्हणत नाही कीं, धर्मातील आचार व विचार यांचा नेहमींच मिलाफ झालेला असतो. कधी कधी त्यांच्यात फारकत झालेली नजरेस येते. परंतु जेव्हां जेव्हा धर्माचे आचार त्या धर्माच्या विचारांशी विरोधी असतील तेव्हां तेव्हां धार्मिक आचारामध्यें फेरबदल करून ते धार्मिक विचारांशी सुसंगत करून घेणें अत्यंत आवश्यक आहे. खुद्द टिळकांनी एके ठिकाणी म्हटलें आहे कीं, “ आचारात्मक हिंदु धर्माचे जें लक्षण वर दिलें आहे त्या खेरीज ' धारणात्धर्म: यतोऽम्युदय निःश्रेयस-सिद्धिः स धर्मः ˆ अशी हिंदु धर्म शास्त्रकारांनी स्वीकारलेली धर्माची जी दुसरी तत्वे आहेत तद्नुकूल आचारात फेरफार करण्याचा हिंदू धर्मातील शिष्टांस हिंदुधर्म