महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी - Page 131

महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. ८७

शास्त्रकारांनी जो अधिकार दिलेला आहे, आणि हा अधिकार शास्त्रोक्तरीत्या बजावून स्वतःच्या उदाहरणाने परंपरागत आचारांत शिष्ट जो कांही फरक करतात तो लोकांस मान्य होऊन पुढें तो परंपरागत धर्माचाच एक भाग होत असतो. “ आमच्या इकडील ब्राह्मण्यग्रस्त लोकांच्या मनाला टिळकांच्या मताचा मोठा धीर वाटतो म्हणून आम्ही टिळकांच्या नांवाचा मुद्दाम उल्लेख केला आहे. खरें ह्यटले असतां या बुद्धिवादाला कोणाचाच आधार नको. इतका तो यथार्थ आहे. तसें जर नसेल तर प्राचीन आचारांस कवटाळणें हाच धर्म होऊन बसेल ; व जे आचार श्रेयस्कर नसतील ते केव्हांच लुप्त व्हायचे नाहींत मग अस्पृश्यतेसारखे अति निंद्य व घोर रिवाज अनादिसिद्ध एवढ्याच कारणावरून अबाधित चालूं राहातील. परंतु हा नवा आचारधर्म कोणी घालून द्यावयाचा ? तो शिष्ट लोकांनीं घालून द्यावयाचा आहे असें आमचे मत आहे. व तें टिळकांचेंहि होते हें वर दिलेल्या Vara वरून उघड होत आहे. तेव्हां या लोकांनीं महाडच्या प्रसंगी काय केलें, असा साहजिकच प्रश्‍न उद्‌भवतो. आम्हांस असें वाटतें कीं, तोंडानें मनुष्य ईश्वरांचे रूप आहे असें म्हणावयाचें व मनानें मात्र तो अमूक एका जातींत जन्मल्यामुळें त्यांस अपवित्र मानावयाचे हा हिंदुधर्मावर येणारा दांभिकपणाचा आरोप नाहींसा करण्यास या शिष्ट लोकांनीं प्रयत्न करावयास पाहिजे होता. अस्पृश्यांचा धिक्कार करून आपल्या उज्जल धर्माला काळिमा लावणाऱ्या पापाचरणी धर्मवेड्या लोकांच्या असल्या अधम कृत्यापासून परावर्तन करणें हें त्यांचें कर्तव्य होतें. हिंदुसमाजाची भरती अजिबात बंद झाली असून त्याला सारखी ओहोटी लागली आहे हें उघड्या डोळ्यांनी पाहात असतां, हिंदुधर्मांत आहेत त्यांचा छळ करून लोकविग्रह करण्याचे दुष्ट प्रयत्नांस आळा घालून त्यांना न्यायानें व समतेनें वागवून लोकसंग्रह करण्याचा धडा या लोकांनी अशावेळीं घालून देणें अवश्य होतें, यास कोणी ना म्हणेल असें वाटत नाहीं. पण या शिष्ट म्हणविणाऱ्या मतिमंद लोकांनी यांपैकी एकही गोष्ट केली नाहीं. उलट, आपलें कर्तव्य बजाविण्याची वेळ आली असतांना जाणून बुजून शिंगें मोडून वासरांत शिरण्याचा नीच प्रयत्न त्यांनी केला. अस्पृश्यांनी पाणी घेतल्यामुळे

कलह करण्यावरच त्यांनी ही गोष्ट थांबविली असती तरी आम्हांस त्याचें फारसे

वाईट वाटलें नसतें. आम्हाला ज्या गोष्टीचा विशेष संताप आला आहे ती या शिष्टांनीं तळ्याची शुद्धि करून प्रतिगामी धोरणांचें अवलंबन केले. अस्पृश्य लोक निधड्या छांतीनें तळ्यावर जाऊन आपल्या देहाची पवित्रता सिद्ध करून देण्यास प्रवृत्त झालें असतां तळ्याची शुद्धी करण्यात येऊन अस्पृश्य हें अपवित्र आहेत व त्यांचा संसर्ग झाल्यानें भ्रष्टाकार होतो याचा कायमचा ठसा मारावा हाच त्यांच्या शुद्धि-समारंभाचा उद्देश होता हें उघड आहे. शुद्धि-समारंभ करणाऱ्या या पाजी लोकांनीं