महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी - Page 133

महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. ८९

ही हिंदुधर्मावरील आणीबाणीची वेळ असतांना या शिष्ट लोकांनीं जें निंद्य व बेजबाबदारपणाचें वर्तन केलें त्याबद्दल आम्हांस मुख्यत्वे जें लिहावयाचें आहे तें हेंच कीं, अशा प्रकारच्या होणाऱ्या

दंग्यात विशेषतः ब्राह्मणेतर लोकच प्रामुख्याने भाग घेतात

अशी नेहमींची गत आहे. याचा अनुभव आम्हांस महाड येथें प्रत्यक्ष पाहावयास मिळाला. यांनीं महाड येथें मारामारी केलीच; पण यांच्या जातभाईनीं गांवोगांव अस्पृश्यांचा सारखा छळ चालविलेला आहे हें आमच्याकडे येत असलेल्या बातम्यांवरून उघड होत आहे. हें लोक इतकें आडमूठे असतात कीं, मारहाण करण्यास व बायकांची विटंबना करण्यास त्यांना कांहींच वाटत नाहीं | असमानतेचें उच्चाटण करून समानतेच्या पायावर हिंदुसमाजाची रचना करण्याकरिता अवतार घेतलेल्या ब्राह्मणेतर पक्षांत समाविष्ट असलेल्या जनतेच्या हातून असें नीच वर्तन घडावें, हें त्या पक्षाच्या उज्वल तत्त्वांना काळिमा लावणारें आहे असें आमचें स्पष्ट मत आहे. ब्राह्मणेतर पक्षासंबंधानें आमचे विचार आम्ही स्वतंत्रपणें मांडणार आहोंत. त्यावेळीं त्या पक्षाच्या जबाबदारी संबंधानें आम्हांला जें काहीं लिहावयाचे आहे तें आम्ही लिहूंच. पण महाड येथील दंग्यांत जी एक विलक्षण गोष्ट आमच्या निदर्शनास आली ती हीं कीं, खुद्द शेटजी व भटजी, गांधीटोपी व टिळकशर्ट घालून ब्राह्मण्यसंरक्षणार्थ काठ्या घेऊन पुढें आले होते. इतकेच नव्हे तर गांवोगांवी याच लोकांनीं ““ आमचें तळें बाटलें, तुमच्या विहिरी सांभाळा, “ असे संदेश पाठविलें व खेडोपाडी अल्पसंख्यांक असणाऱ्या अस्पृश्यांविरुद्ध बहुसंख्यांक ब्राह्मणेतर जनतेस चिथावून दिलें ! ब्राह्मण्यसंरक्षणार्थ धांवून येणाऱ्या या शेटजी-भटजींचे त्यांच्या पराक्रमाबददल _ आम्ही अभिनंदन करतो. पण आम्हांस त्यांना एका गोष्टीची आठवण करून देणें भाग पडत आहे. ब्राह्मणेतर जातींत समाविष्ट झालेल्या जाती या हल्लीच्या काळीं तः. माकडाप्रमाणें निर्बुद्ध आहेत.

माकडाच्या हाती कोलीत

दिल्यापासून आत्मघात होणार आहे, हें या शेटजीं-भटजींनीं पक्के लक्षांत ठेवावें ! याच ब्राह्मणेतर जनतेनें एके काळीं घाटावरील शेटजींची नाके कापून त्यांच्या घरादारांची राखरांगोळी केली आहे हें इतिहासप्रसिद्ध आहे. जो प्रकार घाटावर घडला तोच घांटाखालीं घडणार नाहीं, हे कोण सांगूं शकेल ? जें लोक आज आपल्या हातांतील दांडे म्हणून वागत आहेत तेच उद्यां आपले काळ होतील, हें त्यांनी खूप ध्यानांत ठेवावे. नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध