महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी - Page 134

९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

झाले आहे. तारीख २९-३-२७ च्या ' केसरी ' च्या अंकांत या माकडांनी आपल्या हातचें कोलींत ब्राह्मणांच्या घरांवर कसे फिरविलें याची हकीकत देऊन SRM “ प्रासंगिक बोल या आपल्या सदराखाली आपले विचार प्रगट केले आहेत. खालील उतारा त्यांतून घेतला आहे.

७. सत्यशोधक समाजाचे । पुढारी समतेची मोठमोठी तत्वें बोलतात, पण खेड्यांपाड्यांतून सत्यशोधकी मताचें वारें शिरल्याबरोबर तेथील वातावरण

wae भरून जातें, व ब्राह्मणांचं जीवित असह्य होतें. सत्यशोधकी

लेखकांच्या जिभेवर बुद्ध, ख्रिस्त, गांधी इत्यादी थोर व्यक्तीचीं नांवें खेळत असतात. पण गांवोगांवी चाललेल्या द्वेषमूलक व अत्याचारी वृत्तीच्या सत्यशोधकांचा निषेध किंवा त्यांच्या दुष्कृत्यांस आळा घालण्याचा यत्किंचितही प्रयत्न हे पुढारी किंवा लेखक करीत नाहींत. यामुळे सत्यशोधक म्हणजे जातिद्वेष पसरवून अत्याचारी वृत्तीचा प्रसार करणारे असा अर्थ समाजात रूढ झाला आहे. खेडेगांवांतील सत्यशोधकांच्या उपद्रवासंबंधी दर आठवड्यास आमचेकडे तक्रारी येत असतात. त्यांत बहुतेक बाहेरून येणारा ब्राह्मणेतर शाळामास्तर हा सर्व उपद्रवास प्रेरक झालेला असतो. हा शाळामास्तर आल्यापासून एकदोन वर्षाचे आंतच गांवांत असलेल्या शांततेचे व सलोख्याचे वातावरण बिघडवून टाकतो आणि समतेच्या उच्च तत्त्वाचे ऐवजीं अत्याचारी जातीद्वेषाचें भूत गांवांत मनसोक्त थैमान करूं लागतें |

८. मासल्याकरिता या अनेक हकीकती पैकी एक हकीकत देतो. x > गांवांत त्रोकसंख्या सुमारें १,००० आहे. पैकीं ३० ब्राह्मण, २०० मराठे व बाकीचे धनगर, महार वगैरे. या गांवांत सत्यसमाजाचें IRN दोन वर्षापासून खेळूं लागलें आहे. ते इतके दिवस धुमसत होतें, पण आतां त्यानें पेट घेतला आहे. सत्यसमाजिस्ट पुढारी हा तेथील शाळामास्तर आहे. गांवांतील पुष्कळसे अशिक्षित लोक त्या मास्तराच्या सांगण्याप्रमाणे वागतात. " माझी हीच शेतकऱ्यांस विनंती ! सोडा भटाची संगती “ असली ब्रह्मद्वेषी गाणी मुलांच्या हाती देण्यांत येतात. ब्राह्मण, मारवाडी लोकांच्या बायकांस घराबाहेर पडणें कठिण झालें आहे. तर एखादी बाई बाहेर दिसली तर तिला मुलांकडून खडे मारवितात व ही हकीकत वर्तमान पत्रात अगर अधिकाऱ्यांस कळविण्याचा ब्राह्मणांनी प्रयत्न केल्यास गंजी जाळणें, रस्त्यांत मारहाण करणें, इत्यादी अत्याचारी प्रकार सुरू होतात. ब्राह्मणांच्या बाजूस असणाऱ्या एका मुसलमान मास्तरास ठार मारण्याच्या धमक्या देण्यांत आल्या व प्रत्यक्ष मारहाण करण्यांत

† पाहा, परिशिष्ट क्रमांक ३.