महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. ९१
आली. “ असल्या हकीकती नांव-गांव देऊन प्रसिद्ध केल्यास अल्पसंख्य ब्राह्मणास अधिकच त्रास होण्याचा संभव असल्यामुळें वरील पत्रांतून नांव-गांव गाळलें आहे.
९. सत्यशोधक पुढारी व त्यांच्या शाद्विक समतेच्या वाक्पाटवास भाळलेले काही अननुभवी ध्येयवादी यांचेपुढें या गोष्टी मांडूनही ते त्याबद्दल फारसा विचार करीत नाहीत, तेव्हां ब्राह्मण समाजानें या गोष्टींचा विचार करून कांही तरी धोरण निश्चित केले पाहिजे. काही खेड्यांतील ब्राह्मण लोक खेडी सोडून जातात. तर कांही या जाचांत कसेबसे दिवस pda असतात. अकोल्यास भरणाऱ्या बृहन्महाराष्ट्र ब्राह्मण परिषदेनें या प्रश्नाचा विचार करणें जरूर आहे. या कामासंबंधानें एखादें मध्यवर्ती मंडळ नेमून त्यांनें सर्व ठिकाणच्या तक्रारी संबंधीची माहिती गोळा करावी व ती वारंवार सरकारच्या व लोकांच्या नजरेस आणावी. आणि वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्यास तयार असतील तर त्यांस व्यक्तींची नांवें कळवावी. सरकारकडे केलेल्या तक्रारींचा फारसा उपयोग होत नाही हें आजपर्यंत दिसून आले आहे.
सैतानाचे तोंडचे हे वेद
ऐकून कोणास आश्चर्य वाटणार नाही ? ज्यांना न्यायाने वागण्याची बुद्धि सुचत नाही त्यांच्यावर अन्याय झाला तर कोणाला सहानुभूति वाटणार आहे ? सर्पाचें डोकें ठेचलें तर त्याच्याबद्दल शोक कोणीं करावा ? वास्तविक पाहांता खेडोपाडी अस्पृश्य लोकही अल्पसंख्यांक आहेत; व त्यांच्यावरही ब्राह्मणेतर जनतेकडून जोरजुलूम करण्यांत येतो. समदुःखी म्हणून ब्राह्मणांवर होत असलेल्या अत्याचारांब्दल त्यांना वाईट वाटावयास पाहिजे; पण आज त्यांना तसें वाटणे, शक्य नाही. जो त्यांच्यावर प्रसंग आल्यास त्यांस सहाय्य करील त्यावर प्रसंग गुदरला असतां ते त्यास सहाय्य करतील हें उघड आहे. पण या भटजींना आपल्या भीषण भविष्यकाळाची पूर्ण जाणीव कोठें झाली आहे ? तशी जाणीव झाली असती तर त्यांनी अस्पृश्यांशी अशा प्रकारचें वर्तन ` केलें असतें, असें मुळींच संभवत नाही. पण हा प्रश्न त्यांच्याच तरणोपायाचा असून तो त्यांनी सोडवावयाचा आहे. आम्हांला त्यांना एवढेंच सांगावयाचें आहे की, आजवर महात्मा गांधी प्रमाणे अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील मोठा कलंक आहे. असें आम्ही मानीत होतों ; पण आतां आमची दृष्टि फिरली आहे; वतो आमच्या नरदेहावरील कलंक आहे असें आम्ही समजतों. हा हिंदुधर्मावरील कलंक आहे असें जोपर्यंत आम्ही मानीत होतों तोंपर्यंत तो काढून टाकण्यांचे कार्य आम्हीं तुमच्यावर सोंपविलें होतें हा आमच्यावरील कलंक आहे अशी आमची