२४
असा अध-पात होण्यापेक्षा
नि:पात झालेला काय वाईट ?
महाड येथील पाणी प्रकरणाविषयीची हकीकत बहिष्कृत भारतांत प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणें इतर वर्तमान पत्रांतूनहि प्रसिद्ध झाली आहे. बहिष्कृत भारतांत प्रसिद्ध झालेला मजकूर व इतर वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेला मजकूर या दोहोंमध्ये एकवाक्यता नाही हें आम्हांस कबूल आहे. परंतु या दोहोंत जो थोडाबहुत फरक दिसतो त्याचीं कारणें जाणून घेण्याऐवजी त्याचा फायदा घेऊन बहिष्कृत भारतांत जी हकीकत प्रसिद्ध झाली नाही ती खोटी आहे असा जो कोटिक्रम कुलाबा समाचारांने केला आहे तो मात्र आम्हांस कबूल नाही. कुलाबा समाचार आपल्या ता. १६-४-२७ च्या अंकांत म्हणतो “ महाडांत मार बसलेल्या महारांची संख्या किती आहे हें कोठें प्रसिद्ध झालेलें नाही. पण... . ' शेंकडो अस्पृश्यांना AR बसला व तोहि ' बेदम ' हें धादांत खोटें आहे. स्वत: डॉ. आंबेडकर हेहि आपल्या ' बहिष्कृत भारत ' पत्रांत तसें लिहित नाहींत. मारानंतर महार मंडळी डाक बंगल्यावर डॉ. आंबेडकरांच्या भेटीस गेली. त्यांची संख्या “ अदमासें शंभर “ होती व त्यांत कांहीं जखमी झालेले लोक होते. " एवढेंच ते लिहितात. “ ” महार लोकांचें जेवण चालूं असतां वरिष्ठ वर्गाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची दाणादाण केली व शिजलेले अन्नहि त्यांच्या पोटांत जाऊ दिले नाही. अशा बातम्या कित्येक पत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत, त्याहि साफ खोट्या आहेत हें बहिष्कृत भारतांतील हकीकतीवरून सिद्ध होत आहे. “ आमच्या पत्रांतून प्रसिद्ध झालेल्या माहितीचा आधार देऊन इतर वर्तमानपत्रांना खोटें करण्याचा हा जो कोटीक्रम कुलाबा समाचारानें लढविला आहे तो आमच्या मतें संयुक्तिक नाही. केवळ एका पत्रांत प्रसिद्ध झालेली हकीकत दुसऱया पत्रांत प्रसिद्ध झालेली नाही यावरूनच ती खोटी आहे असें मानणें हें जर तर्कशास्त्रास धरून आहे, तर ज्या बातम्या आम्ही प्रसिद्ध केल्या त्या बातम्या इतरांनीं प्रसिद्ध केल्या नाहींत म्हणून त्या खोट्या आहेत असा आरोप कुलाबा समाचारानें आमच्यावर कां केला नाहीं याचा उलगडा आम्हांस होत नाहीं. उलट आम्हीं विरेशवराच्या देवळांत गर्दी जमण्यास सुरूवात झाली असतांना फौजदारानें येऊन जी चौकशी केली ती हकीकत अगर ब्राह्मणेतर पुढाऱ्यांची खासगी बैठक बोलावण्यांत आल्याची हकीकत जी दिली आहे ती इतर