असा अधःपात होण्यापेक्षा निःपात झालेला काय वाईट ? - Page 138

९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कोणत्याच वर्तमान पत्रांत प्रसिद्ध झालेली नसतांना ती खरी आहे असें मानून तिच्यावर मोठें थोरलें भाष्य रचण्यांत आलें आहे. पूर्वग्रहानुरुप ठरलेल्या निकालांत जुळता असेल तेवढाच भाग जबानींतून घ्यावयाचा व बाकीचा खोटा म्हणून टाकून द्यावयाचा हें खरें तकशास्त्र नसून शुद्ध तकटपणा आहे. या बाबतींत आम्हांस खुलासा करावयाचा आहे तो हा की, ज्या बातमीदारांनी “ विजयी मराठा “ “ ज्ञानप्रकाश “ व “ नवाकाळ “ यांत ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्या त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. कारण ते बातमीदार त्या ठिकाणीं हजर असून कांहींनी झालेल्या प्रसंगाचा अनुभव घेतला आहे हें आम्हांस पक्केपणी माहित आहे. म्हणून त्यांनी दिलेली माहिती केव्हांहि अविश्वसनीय मानतां येणार नाही. झालेल्या दंग्यांत एकाच माणसास सर्व गोष्टींचे अवलोकन करणें अशक्य आहें. कांहींनीं कांहीं गोष्टी पाहिल्या. कांहींनी दुसऱ्या पाहिल्या. यामुळेंच आमच्यांत व इतर वृत्तपत्रकारांत दिलेल्या बातम्यांत फरक झाला आहे. त्या सर्वांचे एकीकरण करून, एकसूत्री हकीकत आम्हांस छापतां आली असती हें खरें आहे. पण तसें न होण्याचें कारण असेंच कीं, महाडहून परत आल्यानंतर वरील पत्राच्या बातमीदारांची व आमची भेट होण्याचा योग आला नाही. तो जर आला असता तर त्यांनी दिलेली हकीकत आम्ही जोडून छापली असती. कसेही झाले तरी जो फरक ' कुलाबा समाचारानें ' शोधून काढला आहे त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते कीं, ज्या गोष्टीची खातरजमा झाली नाहीं अशा गोष्टी प्रसिद्ध करण्याइतके बेजबाबदार पत्र * बहिष्कृत भारत * नाही. याशिवाय दुसरें कांहींच सिद्ध होऊ शकत नाहीं. म्हणून जिज्ञासू वाचकांनी कुलाबा समाचाराच्या तकवितर्कास बाजूस सारून आमच्या व उपरीनिर्दिष्ट पत्रांत दिलेल्या हकीकती परस्पर विरोधी नसून एकमेकांस परिपूरक आहेत असें समजून

त्यांचे ग्रहण करावें.

' कुलाबा समाचारानें ' ज्याप्रमाणें आमचा आधार घेऊन इतर वर्तमानपत्रकर्त्यांना खोटें ठरविण्याचा प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणें इतर वर्तमानसाराचा आधार घेऊन आम्हांस कांहीं बाबतींत खोटें ठरविण्याचा प्रयत्न त्यानें केला आहे. आम्हीं ' मामलेदार साहेबांनी दंगा मिटविण्याच्या कामीं तत्परता दाखविली नाही ' असें जें विधान केलें आहे त्यास अनुसरून ' कुलाबा समाचार ' म्हणतो, “ डॉ. आंबेडकरांचाहि रोष मामलेदारांवर दिसतोच. पण महाडांतील पुष्कळ लोकांचें मत असे आहे कीं, ता. २० मार्च रोजी महाडच्या मामलेदार, फौजदारांनी जर माथे शांत राखले नसतें व सहाजिक, चिडलेल्या महार पुढाऱ्यांस खुष करण्यासाठी गोळीबार अथवा धरपकड केली असती तर त्या दिवशीं महाडांत