९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
म्हणतों त्याची सत्यता पटविण्यास फार दूर जावयास नको. प्रथमतः अस्पृश्य लोक देवळांत जावयाचें होते तर तळ्यावरून परत फिरल्यावर ते तडक देवळाकडे आले असते. पण देऊळ हांकेवर उरले असतांना अस्पृश्य लोक आपापल्या छावणीकडे फुटून गेले, यावरून कोणाही समंजस माणसास तर्क करता आला असता कीं, अस्पृश्य लोकांचा देवळांत शिरण्याचा इरादा नसला पाहिजे. दुसरा पुरावा असा आहे कीं, स्पृश्य लोक जर विरेश्वराच्या देवळासभोंवतीं केवळ देवळाचे संरक्षण करण्याकरितां जमले होते तर जेव्हां डॉ. आंबेडकरांचा निरोप फौजदारांनी सांगितला त्यावेळी गर्दी कां मोडली नाही ? अर्थात देवळाचें संरक्षण हा त्यांचा मुख्य हेतु नव्हता, तो जर असता तर देवळाचे संरक्षण करण्याचें कारणच उरलें नाही, हें समजल्याबरोबर ते निघून गेले नसते काय? याशिवाय आमच्या म्हणण्याला तिसरा पुरावा आम्ही देतों. देवळा सभोंवती जमलेल्या लोकांची समजूत करण्यासाठी जेव्हां डॉ. आंबेडकरांना नेण्यात आले तेंव्हा दंग्याचे पुढारी यांनी त्यांना देवळांत शिरणार कीं काय, असा प्रश्न विचारावयास पाहिजे होता. पण त्याबद्दल त्यांनीं अवाक्षरसुद्धां काढलें नाहीं. उलट तुम्ही तळ्यावर कां गेलांत? याच प्रश्नावर त्यांनी वाद चालू केला. यावरून काय दिसतें ? पाण्यावरूनच लोक चिडले होते, पण म्युनिसिपालिटीचा ठराव* व गावांतील स्पृश्य लोकांचा पाठिंबा या दोहोंस झिडकारून देण्याची लाज वाटल्यामुळे देवळाचें निमित्त पुढें करून तळें बाटविल्याचें ve त्यांनी काढलें. या शिवाय दुसरा निष्कर्ष निघूं शकत नाहीं. थोडक्यांत सांगावयाचे तर या सर्व पुराव्याची कांहीच जरूरी नाहीं. एकाच गोष्टीवरून आमचे म्हणणें खरें ठरत आहे. जे लोक आमचें म्हणणें खोटें आहे असें म्हणतात, त्यांना आम्ही असें विचारतों कीं, तळें बाटल्यामुळें जर स्पृश्य लोकांचा क्षोभ झाला नव्हता तर मग तळ्याची शुद्धि कां करण्यांत आली ? चाबुकस्वार कर्त्यांनी ज्यांच्या पासून आपली माहिती मिळविली त्यांना हा प्रश्न करण्यास ते विसरले हें उघड आहे. परंतु त्यांनी जर तो प्रश्न केला असता तर त्यांना कळलें असतें कीं, हे अपराधी लोक आपल्या अपराधाची तीव्रता कमी करण्यासाठीं भलभलतें कोटीक्रम लढवित आहेत. कोणा एका चांभाराने उन्मत्तपणें ” पाणीच प्यालो काय, पण तळ्यांत कातडेसुद्धां धुतलें “ असे लोकांना छातीठोकपणे सांगितल्यामुळे राग आला. आपण अस्पृश्य आहोंत हें दाखविण्यांकरितां कांही अस्पृश्य लोकांनी बाजारपेठेतील कलिंगडाच्या टोपल्यावर झडप घातली, अथवा स्पृश्य वर्गाच्या मुली
"हा ठराव सार्वजनिक ठिकाणे व पाणवठे या संबंधाचा होता. महाड म्युनिसिपालिटीने सुरेन्द्रनाथ टिपणीस अध्यक्ष असताना ठराव क्र. ६७/२७ दिनांक ५-१-१९२४ द्वारा महाड येथील चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले असल्याचे जाहीर केले होते. |