असा अध:पात होण्यापेक्षा नि:पात झालेला काय वाईट ? ९७
मागितल्या इत्यादि कारणांमुळे मारामार झाली, नाहींतर झाली नसती. असें जें प्रसिद्ध करण्यांत आलें आहे, तो निव्वळ बाष्कळपणा आहे. अस्पृश्यांनी त्या दिवशी दाखविलेला धीर इतका वाखाणण्यासारखा होता कीं, विरुद्ध पक्षास आपली बाजू उजळ करून दाखविण्यात त्यांच्यावर शिंतोडे उडविल्याखेरीज गत्यंतरच नाही.
चाबुकस्वारांनी आपली माहिती स्पृश्य लोकांकडून मिळविली आहे याबद्दल कांही शंका नाहीं. हे लोक आपल्या तोंडाला लागलेली काळोखी पुसून टाकण्यासाठी बनावट गोष्ट सांगणार हें साहजीक आहे, हें चाबुकस्वारकर्त्यांनीं ध्यानांत ठेवावयास पाहिजे होतें. परंतु याचा त्यास विसर पडल्यामुळे, खरें बाहेर येण्याऐवजी त्यांची बातमी भरमसाट विधानांनी माखली गेली आहे, उदाहरणार्थ, “ त्या दिवशी प्रमुख अस्पृश्य लोकांस पोलीसच्या संरक्षणाखाली ठेवण्यांत आले ! खुद्द आंबेडकरांना पोलीसनें आपल्या संरक्षण खाली ठेविलें. . . . . ते जर दंगा करणाऱ्या लोकांच्या हातांत सांपडते तर त्यांच्या जिवावर बेतल्याखेरीज कधीही राहिलें नसतें. वगैरे विधाने गैर समजूत करणारी तर आहेतच, पण ती खरीही नाहींत. प्रमुख अस्पृश्य लोक दंगेखोरांच्या हातांत सांपडले नव्हते, ही बातमी त्यांना कोठून मिळाली कोणजाणे. परिषदेस आलेल्या अस्पृश्य प्रतिनिधीच्या दोन छावण्या होत्या. खुद्द आंबेडकर व त्यांच्या बरोबर मुंबईहून आलेल्या प्रमुख मंडळींची छावणी विरेश्वराच्या देवळापासून फार फार तर दोनशें यार्डावरील डांक बंगल्यांत होती. शिवाय ती छावणी इतर सर्व अस्पृश्य ` प्रतिनिधींच्या छावणीपासून दीड मैलाच्या अंतरावर असल्याकारणाने एका छावणीवर हल्ला झाला असतां दुसऱ्या छावणीकडून कुमक येणें शक्य नव्हतें. अशा प्रकारे अगदी तुटून पडलेल्या छावणीवर हल्ला करावयास काय हरकत होती ? बरें त्या छावणीत माणसें दहाच्या वर नव्हतीं, असें असतां देखील या “ शूर ” लोकांना या जवळच्या छावणीकडे मोर्चा फिरविण्याचें धैर्य झालें नाहीं. शत्रूच्या टप्प्याच्या आंत हीं प्रमुख मंडळी होती इतकेंच नव्हे तर एके समयी ती त्यांच्या जबड्यांत होती. समजूत करण्यास जेव्हां डॉ. आंबेडकर व इतर प्रमुख मंडली डांक बंगल्याच्या बाहेर आली तेव्हां ती देवळासभोंवार जमलेल्या लोकांच्या तडाख्यात नव्हती तर कोठें होती ? व आम्हांस जो अचंबा वाटतो तो हाच कीं, ज्या अस्पृश्यांतील प्रमुख लोकांच्या करणीमुळें हा तळें बाटविण्याचा क्षोभकारक प्रकार घडला, ते लोक चालून माऱ्यांत आले असतांना त्यांच्यावर हातसुद्धां उगारला गेला नाहीं ! फुटून फाटून जाणाऱ्या अस्पृश्य प्रतिनिधीवर वीरश्री गाजविणाऱ्यांचे तेज त्यांच्यापुढे कोठें नाहिसेंच झालें. अशी
डब्ल्यू-२०७३-७ अ ,