९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वस्तुस्थिती असतांना आपल्यावर बेतेल म्हणून डॉ. आंबेडकरांना पोलीसचा आश्रय करावा लागला हें म्हणणें किती वायफळ आहे हें उघड आहे. पोलीसच्या ठाण्यावर डॉ. आंबेडकर व मुंबईच्या पाहुणे मंडळीस राहावें लागले हें खरें, पण तें या नेभळ्या लोकांच्या भयामुळें नव्हें. त्यांचे कारण अगदीं निराळें आहे, डांक बंगला १९ व २० या दोन दिवसां करतां वापर करावयास मिळाला होता. २१ तारखेस कुलाबा जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिनटेन्डेंट महाडास येणार असल्यामुळे ती जागा त्यांस खाली करून देणें प्राप्त होतें. मुंबईच्या प्रतिनिधीस झालेल्या गोष्टीं कायद्याच्या सूत्रांत गोवल्याखेरीज महाड सोडून मुंबईस जाणें शक्य नव्हतें. शिवाय एवढ्या सर्वांची एके ठिकाणीं व्यवस्था होईल अशी प्रशस्त जागा पाहिजे होती. अशा वेळी पोलीस ठाण्यावर रिकामी असेलेली एक खोली त्यांना देऊ केली व इतर कांही सोय नसल्याकारणांनें तिचा स्विकार करावा लागला. चाबुकस्वारांत प्रसिद्ध झालेली हकीकत ही खऱ्या स्थितीचा विपर्यास आहे, हें वरील खुलाशावरून दिसून येईल. ज्याप्रमाणें चाबुकस्वारानें स्पृश्यांकडें जाऊन चौकशी केली तशीच त्यांनी महाड येथील अस्पृश्यांकडे जाऊन चौकशी केली असती तर त्यांना खऱ्या-खोट्याचा थांगपत्ता लागला असता. पण त्यांनी तसें केलें नाहीं. खरें शोधून काढण्यास सर्वस्वी खोट्यांच्या साक्षीवर अवलंबून राहिल्याने त्यांचा दौरा निष्फळ झाला आहे असें आम्हांस कष्टाने म्हणावें
लागते.
चवदार तळ्यावर जाण्याचा निश्चय कसा ठरला व तो अंमलात आणण्यापूर्वी परिषदेच्या चालकांनी स्पृश्य हिंदुंचे मत अजमाविण्यासाठीं कोणते प्रयत्न केले याची हकिकत आम्हीं ब. भा. च्या १ ल्या अंकांत दिली आहे. त्यांत स्पृश्य हिंदूचें मत अनुकूल दिसल्यामुळे अस्पृश्य लोक तळ्यावर गेले असें आम्ही लिहिलें होतें. पण ज्या स्पृश्य हिंदूंनी ठरावाला पाठिंबा दिला तेच आतां उलटून पडले आहेत व ' मी नाही, मी नाही ' म्हणून सांपडेल त्या चोर ares निसटू पहात आहेत. रा. जोशी यांनीं ता. १/४/२७ च्या ज्ञानप्रकाशांत एक पत्र लिहून आपली जबाबदारी टाळण्याचा जो प्रयत्न केला आहे तो या धरसोडीच्या वर्तनाचा एक दाखला आहे. रा. जोशी आपल्या पत्रांत म्हणतात, “ मी माझ्या भाषणात चवदार तळ्यांचा उल्लेखसुद्धां केला नाहीं. मग माझ्या प्रोत्साहनाने “ अस्पृश्यलोक तळ्यावर गेले हें विधान धादांत खोटे आहे “. आम्हीं तर असें म्हणतों कीं, अस्पृश्यलोक रा. जोशी, किंवा धारिया यांच्याच फक्त सल्ल्यानें गेले नसून सभेस
डब्ल्यू-२०७३-७ ब