असा अध:पात होण्यापेक्षा नि:पात झालेला काय वाईट ? ९९
जमलेल्यां सर्व स्पृश्य लोकांच्या अनुमतीने तें गेले. कारण जो ठराव a झाला
तो सभेंत मांडण्यापूर्वी जमलेल्या वरिष्ठ हिंदूंना दाखविण्यांत आला होता, व एका मिश्र विवाहाच्या कलमाशिवाय 4 तो त्या सर्वांनी मान्यहि केला होता. केवळ सर्वाना त्यावर बोलणे शक्य नसल्याकारणाने आपल्यावरील ही कामगिरी त्यांनी या दोघां मित्रांवर सोपविली. यावरून उघड आहे की, रा. जोशी व धारिया यांनी ठरावाला जो पाठिंबा दिला तो स्वतःपुरतां नसून सर्वातर्फ दिला होता. पण हें सर्व बाजूस ठेवून रा. जोशांपुरतेच पाहिले तरी त्यांच्या प्रोत्साहनाने अस्पृश्य लोक तळ्यावर गेले नाहींत असा जो बुद्धिवाद त्यानी लढविला आहे तो वास्तविक खरा नाहीं. सभेंत जो ठराव मांडला होता तो सर्वसाधारण स्वरुपाचा होता व सार्वजनिक पाणवठ्याचा उपभोग घेण्याकरिता अस्पृश्यांना स्पृश्यांनी मदत करावी ही ठरावाची भाषा होती. अशा ठरावास जो गृहस्थ पाठिंबा देतो तो गृहस्थ पर्यायाने चवदार तळ्यावर पाणी घेण्यास अस्पृश्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी ठरतो असे मानावयास काय हरकत आहे हें आम्हांस कळत नाही. ठराव सर्वसाधारण होता. अर्थात त्यांत रा. जोशांच्या महाडांतील चवदार तळ्याचा समावेश होत नव्हता असे कोणास म्हणता यावयाचे नाही. महाडांतील तळी ती मुले व इतरत्र ती कारटीं म्हणून अस्पृश्य लोक गेलेच तर चवदार तळें वगळून अन्यत्र असलेल्या तलावावर जातील असल्या भ्रामक कल्पनेने रा. जोशांनी संमती दिली असेल असे संभवत नाही. परंतु तसें जर असेल तर रा. जोशा इतका बेअक्कल माणूस म्हणजे जोशीच हें उघड आहे. मागाहून हाकाटी करण्याऐवजी ठरावास पाठिंबा देण्यापूर्वीच सर्वत्र ठिकाणच्या तळ्यावर वेतणारी गोष्ट आपल्या चवदार तळ्यावर कां वेतणार नाही, याचा रा. जोशी यांनी पूर्ण विचार करावयास पाहिजे होता; पण हा अविचारी ब्राह्मण वीर त्यास मान्य असलेल्या निराकार तत्त्वाने तत्क्षणीच धरलेले साकाररूप पाहून इतका भेदरून गेला आहे की त्यानें आतां खोटे बोलावयास सुरवात केली आहे. रा. जोशी मोठ्या दिमाखानें लिहितात कीं, “आम्ही आपल्याबरोबर येत नाही इतकेच त्यांना (अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांना) सांगून थांबलो नाही तर मी आपल्या कांही अस्पृश्य बंधूंना असेंही सांगितलें कीं, अशा
A अधिवेशनात पास झालेला ठराव असा-” बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे व पाणवठे यांचा उपयोग करून आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचः प्रयत्न करीत असतांना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करून त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात. तसे न करता अशा वेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय सहाय्य
करावे. “
ठरावातील हे कलम पुढीलप्रमाणे होते, “क. जातिभेद मोडण्याचा [उपाय ] [म्हणून ] [मिश्रविवाह ] पद्धतीचा प्रघात सुरु करावा."