१०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
करतील या बद्दल भालाकारांनी खात्री बाळगावी. दुसऱ्या परी पाहिले असतां ओल्या अन्नाची भिक्षा मागून खाणें हा महार मांग जातीचा कांही धंदा नव्हे. खेडेगांवी महार मांग लोक गांवांत भाकर मागतात हें खरें. पणती भिक्षा म्हणून मागत नाहीत. ते बलुत्याचा हक्क म्हणून मागतात. पण ते ओल्या अन्नाची भिक्षा मागतात हें जरी गृहीत धरलें तरी त्यांच्याप्रमाणे इतर जातीतील लोक were ओल्या अञज्नाचें ग्रहण करितात. मराठे लोक ब्राह्मणाच्या घरी शिजलेले ओले अन्न ग्रहण करतात ही खेदाची गोष्ट या ठिकाणी उघडकीस आणणें आम्हांस प्राप्त वाटते. खुद्द पुण्यामध्ये कित्येक मराठा बाया ब्राह्मणांच्या घरी भांडी घासावयास राहतात. आणि आपल्या घरी खाणावळे ठेवितात. पण या खाणावळ्यासाठी ताजे अन्न न शिजवितां ब्राह्मणाच्या घरचे उष्टे आणून त्यांना घालतात व ते तुपाच्या लालचीने कांही किंतु न मानता खातात. परघरी शिजलेले ओलें अन्न खाण्यांत जर अस्पृश्यता साठवलेली असेल तर मराठे लोकांना अस्पृश्य म्हणावयास भालाकार तयार आहेत काय ? खुद्द भालाकाराच्या जातीतील माधुकरी मागणारे विद्यार्थी काय करतात ? ते ओल्या अन्नाची भिक्षा मागत नाहीत काय ? महारामांगांना हिणविणान्या भालाकारांना ब्राह्मण जातीत ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याचा प्रघात आहे हें माहित नसावें असें वाटतें परंतु आम्ही त्यांना आठवण करून देतों कीं, पंजाबांत परजातीतील लोकांकडून ओल्या अन्नाची भिक्षा आणून आपला रोजचा उदरनिर्वाह करण्याचा प्रघात ब्राह्मण कुटुंबात आहे. हे पंजाबी ब्राह्मण पुण्यातील सदाशिव पेठेच्या हौदावर गेले तर भालाकार त्यांच्या पाठी सडकण्यास पुण्यांतील गुंडांचे सेनापति होतील काय ? अस्पृश्यता नित्य नसावी पण असलीच तर नैमित्तिक असावी असें आमचें मत आहे व भालाकारही तसेच म्हणतात हें पाहून आम्हांस एक प्रकारचा आनंद वाटतो. परंतु आम्हांला एवढ्या वरूनच वाईट वाटतें कीं, भालाकार सर्वांना एकाच न्यायानें वागविण्यास तयार असलेले दिसत नाही. जर न्यायच करावयाचा झाला तर त्यांच्या व्याख्येप्रमाणे चांभार व भंगी लोकांना स्पृश्यांत गणावें लागेल. कारण ते ओल्या अन्नाची भिक्षा मागत नाहीत अशी कबुली भालाकारानीच दिलेली आहे. उलट माधुकरी मागणारे ब्राह्मण विद्यार्थी किंवा भिक्षा मागणार पंजाबी ब्राह्मण किंवा उष्टे खाणारे पुण्यातील मराठे या सर्वांना महारा मांगाप्रमाणें अस्पृश्य मानावे लागेल. हें नवें वर्गिकरण प्रचारांत आणावयास भालाकार तयार आहेत काय ? त्यांची अस्पृश्यतेची व्याख्या प्रचारांत आणण्याचा त्यांनी हट्टच धरला तर सकल ब्रह्मवृंदांवर केवढा मोठा अनर्थ ओढवेल याची भालाकारास कल्पना असावीसें दिसत नाही. महारमांगा प्रमाणें