असा अध:पात होण्यापेक्षा नि:पात झालेला काय वाईट ? १०५
दरोबस्त ब्राह्मणांच्या घरी ब्राह्मण स्त्रिया पुरुषांच्या उष्ट्याचे धनी असतात हें जगजाहीर आहे. उष्टेखाणारा तो अस्पृश्य असा नियम लागू केला तर सर्व ब्राह्मणबायांना अस्पृश्य ठरवून घराबाहेर घालवून द्यावे लागेल. म्हणून भालाकारांना आमची अशी प्रेमाची सूचना आहे की, त्यांनी आपली अस्पृश्यतेची व्याख्या परत घ्यावी ; व अस्पृश्यता नित्याची करावयास त्यांनी दुसरी कांहीतरी शक्कल लढवावी. अस्पृश्यांना अपशकून करण्याकरितां स्वतःचे नाक कापून घेण्यासारखा हा अतिप्रसंग त्यांनी करूं नये. पण भालाकार आटोपतें घेतीलच असें मानतां येत नाही. ब्राह्मणी न्याय देवता न्याय निष्ठूर असल्याची ग्वाही देणे कठीण आहे. स्वतःच्या जातीला अपवादांत घालून नियमांची खच्ची करणें हा तिचा नेहमीचा प्रघात आहे. झाला ब्राह्मण भ्रष्ट | तरी तो तिही लोकी श्रेष्ठ | असे न्यायाला धुडकावून प्रतिपादणारे भालाकार उष्टे खाऊनही ब्राह्मणीन पुन्हां स्पृश्य ती स्पृश्य असें म्हणावयास कमी करणार नाहीत असे कोणी म्हणावे ?
अस्पृश्यतेच्या नव्यानें घडलेल्या व्याख्येनें भालाकार इतके बेहोश झाले आहेत कीं, त्यांना पुन्हां आपल्या ता. २५-४-२७ च्या अंकात या जुन्या भाजीला नवी फोडणी देण्याचा उपक्रम केला आहे. पण तिच्यांत कांही स्वारस्य नसल्यामुळें तिची चव घेऊन तोंड विटाळण्याचें आम्हांस कांही कारण दिसत नाही. त्यांतली एकच गोष्ट विचारांत घेण्यासारखी आहे. भालाकार लिहितात, "चांभार, ढोर, महार व मांग या अस्पृश्यांतील चार पोट जातीना एक पाणवठे व एक देऊळ आपसांत प्रथम करावीत, मग स्पृश्यांकडे जी कोणती मागणी या बाबतीत करावयाची असेल ती करावी.“ बोलूनचालून अस्पृश्य जाती कितीतरी अडाणी ! [त्यांच्यावर ] [एवढा ] मोठा बिकट प्रश्न टाकणें हे केव्हांही न्यायाचे होणार [नाही. ] केवळ जीतच करावयाची तर तेही घडवून आणतां येईल. पण आम्हांला जे वाईट वाटतें ते हें कीं, ब्राह्मणासारख्या श्रेष्ठ जातीने [अस्पृश्यांसारख्या ] [अतिशूद्र ] [जातीशी ] [याचना ] करावी की, “ATE, आम्हां अवनत ब्राह्मणजातीला [तुम्ही ] [सन्मार्गाचा ] [धडा ] [घालून ] द्या. “ काय हा ब्राह्मण जातीचा अधःपात [! ] [असा ] [अधःपात ] [होण्यापेक्षा ] [निःपात ] झालेला काय वाईट ?
oC
बहिष्कृत भारत, ता. ६ मे १९२७.